Home हेल्थ तुम्हालाही सवय आहे का दुपारी झोपायची मग जाणून घा त्याचे तोटे

तुम्हालाही सवय आहे का दुपारी झोपायची मग जाणून घा त्याचे तोटे

by Patiljee
1040 views

प्रत्येक व्यक्तीला दुपारी पोटभर जेवल्यावर डुलकी येतेच येते आणि असंही वाटत की आता आपण जेवलो आहे तर मस्त पैकी एक झोप काढावी. नाही म्हणता इतका आळस येतो की आपण स्वतःला अंथरुणात झोकून देतो. दुपारी जेवल्यानंतर झोपल्याने अगदी गाढ अशी झोप येते असे कित्तेक जणांचे म्हणणे असेलही. त्यात काही वाद नाही पण ही गाढ लागणारी झोप तुमच्या शरीरासाठी कितपत योग्य आहे हे ही तुम्हाला समजायला पाहिजे. दुपारी झोपल्याने पोटाचे आजार बळावतात तर कफ होतो त्याचप्रमाणे आपल्या शरीराची चरबी ही वाढते. त्यामुळे दुपारी जेवल्यानंतर झोपणे आपल्या शरीरासाठी कधीही अपायकारक असतेच.

शरीराची चरबी वाढण्यास हे एक सर्वात मोठे कारण आहे. जेव्हा रोज आपण दुपारी जेवण झाल्यानंतर झोप काढतो. त्यावेळी आपल्या शरीरात चरबीचे प्रमाण आपोआप वाढू लागते. वात,कफ आणि पित्त हे तीन दोष आहेत आणि अर्थात तुमची प्रकृती वर दिलेल्या तीनपैकीच एक असली पाहिजे, असं नाही. काही जणांच्या बाबतीत ते दोषांचं मिश्रणदेखील असू शकतं.

कफ बिघडला तर या व्यक्तींचं वजन वाढलेलं बघायला मिळतं. दम लागणं, कफ होणं, पटकन अपचन होणं, अंग जड होणं, काहीच करायची इच्छा न उरणं अशा तक्रारीही कफ बिघडल्यामुळं होऊ शकतात. दुपारच्या झोपेमुळे पचनाची क्रिया असंतुलित होते. यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं. त्यामुऴे मोठ्या प्रमाणात मधूमेह होण्याची शक्यता वाढतात.

दुपारची झोप हेही असू शकते. कफ आणि पित्तदोष निर्माण होऊन अंगाला खाज येऊ शकते. त्यासोबतच यामुळे एक्जिमा, सोरायसिस, शितपित्त, तीळ आणि वांग यांसारखे त्वचेचे विकार बळावू शकतात. केसात कोंडाही होऊ शकतो.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल