Home विचार आजकालच्या लग्नसराई मध्ये बुफे जेवण आणि खाली बसलेली पंगत यातील कोणती जेवण पद्धत तुम्हाला जास्त आवडते?

आजकालच्या लग्नसराई मध्ये बुफे जेवण आणि खाली बसलेली पंगत यातील कोणती जेवण पद्धत तुम्हाला जास्त आवडते?

by Patiljee
786 views

पूर्वीच्या काळी लोक पंगतीत जेवायला बसायचे अर्थात तेव्हा लोकांकडे पैसाही इतका जास्त नसायचा आणि बुफे पद्धत ही अवगत नव्हती. त्यामुळे एका लाईन मध्ये जेवणाच्या पंगतीत बसलेली लोक आपल्याला कधी कधी दिसतात, पण गावाकडे शहराकडे तर सध्या तरी बुफे जेवण पद्धत अवगत झाली आहे. गावाकडे ही काही ठिकाणी अशी पद्धत दिसते. आपल्याला पण ज्याचा खिसा भरलेला तो हे सर्व करणार यात काही गैर नाही पण तरीही आपला समाज कुठेतरी बदलत चालला आहे हे आपल्याला प्रकर्षाने जाणवायला लागले आहे.

सहसा खाली पंगतीत जेवण बनवणाऱ्या लोकांना जास्त खर्च येत नाही कारण जेवण फक्त ते बनवणार वाढायला आपलीच माणसे असतात तर बुफे जेवणात सगळं काही त्या बुफे वाल्यांचे म्हणजे अगदी जेवणापासून ते पाण्याच्या ग्लास पर्यंत, त्यामुळे त्यांचा खर्च हा जास्त आलाच.

शिवाय जेवणाच्या पंगतीत आपल्याला हवे तितके जेवण दिले जाते त्यामुळे अन्नाचा नास कमी प्रमाणत होती याउलट बुफे जेवणामध्ये आपण काय करतो भूक ही फार लागलेली असते आणि इतके पदार्थ असतात की हे घेऊ की ते घेऊ असे होते, त्यामुळे अख्खा ताट भरून अन्न घेतले जाते. त्याने काय होते काही गोष्टी आपल्याला आवडतात तर काही नाही शिवाय अर्ध ताट संपल्यावर कधी कधी आपली भूक ही मिटते. त्यामुळे या पद्धतीत अन्न खूप जास्त वाया जाते यात शंका नाही.

पंगतीत जेवताना कसे समाधानाने जेवण जेवता येते त्यामुळे जेवण चांगले पचते. शिवाय मांडी घालून बसल्यामुळे आपले शरीर लवचिक होते , वजन ही आटोक्यात राहते. बुफे जेवणामध्ये आपल्याला जेवणाचे ताट घेऊन उभ्याने जेवावे लागते. यात लहान मुलांचे आणि वयस्कर लोकांचे हाल होतात. काही ठिकाणी टेबल खुर्च्या असतात बसायला पण त्याही पुरेपूर नसतात. त्यामुळे काय होत तर उभ्याने जेवण पचायला जड जाते शिवाय पोट, पोटातील आतड्या, आणि पाय यांच्यावर दबाव येतो यामुळे पाय दुखणे , कमरेचे दुखणे, गॅस, आम्लपित्त यांसारख्या समस्या निर्माण होतात पचनक्रिया मंदावते.

म्हणायला गेलं तर तस दोन्ही दोन्ही प्रकारचे जेवण उत्तम आहे पण ज्यामधे अन्नाची नासाडी आणि आपल्या शरीरावर होणारा परिणाम यामुळे आपली खाली बसून जेवणाची पंगत उत्तम.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल