मित्रानो आपल्या घरात रोज अन्न शिजवले जाते आणि रोज बनले जाणारे जेवण हे सर्वच संपत नाही तर त्यातील अन्न हे थोडे का होईना शिल्लक राहते आणि आताची महागाई बघता अन्न फेकणे कठीण झाले आहे. शिवाय अन्न फेकणे हे सुध्दा तसे वाईटच म्हणून उरलेले अन्न तसेच दुसऱ्या दिवसापर्यंत चांगले राहण्यासाठी आपण फ्रीजचा वापर करतो पण फ्रीजचा वापर करताना आपण काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात जेणेकरून आपल्या फ्रीजला त्यापासून धोका पोहचू नये.
आपले फ्रीज हे वर्षानुवर्षे तसेच राहावे त्याचे कॉम्प्रेसर कधीही खराब होऊ नये यासाठी काय काय करावे ते आज आपण पाहूया. पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या फ्रीजचा खालचा पाया हा सपाट जागेवर असायला हवा त्यामुळे तुमचा कॉम्प्रेसर अगदी उत्तम प्रकारे काम करतो. आणि म्हणून कॉम्प्रेसर चांगला राहिल्यामुळे तुमचा फ्रीज ही तुम्हाला अगदी उत्तम सर्व्हिस देणार ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आपल्या घरातील फ्रीजची जागा नेहमी हवेशीर असायला हवी म्हणजे काय करायचे तर फ्रीज आणि भिंत या दोघांमधील अंतर हे जवळ जवळ 1 फूट असावे.
त्यामुळे कॉम्प्रेसर मधून येणारी गरम हवा बाहेर फेकण्यात मदत होते अन्यथा फ्रीज मधील अंतर कमी असल्यास कॉम्प्रेसर मधील गरम वाफ भिंतीवर आदळून पुन्हा कॉम्प्रेसर वर येते. त्यामुळे अनेकदा तुम्हाला फ्रीजचे काम करावे लागते शिवाय कधी कधी यामुळे फ्रीजचा गॅस ही संपतो. ज्या ठिकाणी घरात गरम वातावरण आहे त्या ठिकाणी फ्रिज अजिबात ठेऊ नका. त्यामुळे तुमचा फ्रीज लवकर बिघडू शकतो. शिवाय काही लोक फ्रीज मध्ये गरम गरम पदार्थ तसेच ठेवतात. जास्त करून दूध, त्यामुळे लक्षात घ्या तुमच्या फ्रीजचे आयुष्य कमी होत जाते. त्यामुळे कोणतेही पदार्थ हे थंड करूनच फ्रीज मध्ये ठेवावे.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही फ्रीज वारंवार उघडत जाऊ नका किंवा जास्त वेळ उघडा ठेऊ नका त्यामुळे फ्रीज मधील तापमान लगेच वाढते आणि फ्रीज का पुन्हा लगेच थंड व्हावे लागते यामुळे फ्रीज चे पार्ट लवकर खराब व्हायला लागतात. शिवाय आपल्या फ्रिजेर चा डिफरोस्टचा बटण आठवड्यातून एकदा तरी दाबत जा त्यामुळे तुमच्या फ्रिझर मधील बर्फ वितळून तर जाईल पण फ्रीज पुन्हा रिबुट होईल. दर पंधरा ते वीस दिवसातून फ्रिज पुसत जा. जेणेकरून धूळ, घाण बसणार नाही आणि तुमचा फ्रिज नेहमीच चांगला राहील.