मित्रानो माणसाला जसे त्याचा चेहरा सर्वात महत्त्वाचा आहे म्हणजे दुसऱ्यावर इम्प्रेशन पाडायचे असेल तर त्याला आपला चेहरा हा सुंदर दिसायला हवा. यासाठी तो खूप प्रयत्न करत असतो. त्याचप्रमाणे जर तुम्ही एखाद्या गोष्टीवरून हसायला येत असेल आणि तुमचे दात पिवळे असल्यामुळे तुम्ही मुक्तपणे हसू शकत नसाल तर त्यामुळे तुम्ही स्वतला कमी लेखत जे दात हसण्यासाठी आहेत आणि ते तुम्ही लपवून ठेवता. त्यासाठी तुम्हाला नाही वाटतं की ह्याच्यावर काहीतरी उपाय करायला हवे आणि म्हणून आज आपण दात पांढरे केस करायचे यावर घरगुती उपाय करणार आहोत.
पहिली गोष्ट म्हणजे दिवसातून दोन वेळा तरी ब्रश ने दात घासा आणि ब्रश ने दात घासल्यावर त्यावर लिंबुचा वापर करा यासाठी लिंबाचा रस घेऊन तो आपल्या दातांवर घासावा.
त्याचप्रमाणे लिंबांमध्ये वेगवेगळे पदार्थ घालूनही तुम्ही दात पांढरे करू शकता. त्यासाठी लिंबाच्या रसामध्ये थोडे मीठ घालून त्याने दात घासा त्यामुळे तुमचे दात पांढरे होऊ लागतात.
अशा भाज्या खा ज्यांच्यामध्ये अ जीवनसत्व असते. त्यामुळे तुमचे दात पांढरे होण्यास मदत होते उदा. भोपळा आणि गाजर.
तुमचे दात पिवळे पडण्यामागे एक महत्त्वाचे कारण म्हणजे तुमची सवय रोज चहा आणि कॉफीचे जास्त प्रमाणत सेवन करणे. यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे चहा कॉफीचे सेवन कमी करणे.
तुम्ही स्मोकींग करत असाल तर यामुळे ही तुमचे दात पिवळे पडू शकतात, शिवाय दिवसभर आपण काही ना काही खात असतो आणि त्यातील कण दातात अडकतात आणि त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता लगेच चुळ भरत नाही त्यामुळे ही तुमचे दात पिवळे पडतात.
खायचा सोडा ही उपयोगात आणू शकता. यासाठी खायच्या सोड्यामधे थोड लिंबू रस घेऊन त्याने दात घासा त्यामुळे तुम्हाला नक्की फरक जाणवेल.
तुळशीची पाने घ्या आणि याचा उपयोग करा यासाठी ही पाने वाळवा आणि त्याची पावडर करून त्याने दात घासा, तुळशीची पावडर तुम्हाला बाजारात ही विकत मिळेल.