मित्रानो आजकालच्या लोकांना झोप न येणे हा सर्वात जास्त भेडसावणारा प्रश्न आहे. यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असतात म्हणजे अनियमित आणि अरबट चरबट खाणे , सकाळी उशिरा उठणे, डोळ्यासमोर सतत मोबाईल असणे, मानसिक त्रास असणे मग तो घरातला असो किंवा बाहेरचा यामुळे झोप कधीच येत नाही. आता झोप का नाही येत यासाठी बऱ्याच वेळेस मानसिक आणि शारीरिक या दोन्ही गोष्टी कारणीभूत असतात. यांपैकी एक जरी समस्या आपल्यामध्ये असेल तर रात्रीची झोप येणे ही खर तर मुश्किल गोष्ट आहे.
पुरेशी झोप न लागणे यामुळे पुढे जाऊन भविष्यात अल्झाइमर होण्याचा धोका असतो.बर्याच जणांना खूप जास्तवेळ झोपण्याची किंवा खूपच कमी वेळ झोपण्याची सवय असते. या दोन्ही सवयी आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. म्हणून दिवसभर काम केल्यावर रात्री माणसाला विश्रांतीची आवश्यकता असते माणूस झोपला की त्या च्या सर्व इंद्रियांना विश्रांती मिळते. एका लहान मुलाला 8 त 10 तास इतकी झोप आवश्यक असते तर मोठ्या माणसांसाठी तीच झोत 6 ते 7 तास इतकी आवश्यक असते पण आताच्या काळात इतकीही झोप घेणे माणसाच्या नशिबात राहिलेले नाही.
माणसाला रात्री पूर्ण झोप न मिळाल्यामुळे त्याची रोजची सकाळ ही आळसावलेली जाते. त्यामुळे दिवभराचे काम ही धड होत नाही. तसेच पोटाचे आजार ही बळावतात आम्लपित्त, पोटा त गॅस होणे, मळमळणे इत्यादी पितासंबधी आजार होतात. त्याच्यासोबत आणखी आजार उत्पन्न होतात.
पुरेपूर झोप मिळण्यासाठी काय करावे
पहिली गोष्ट म्हणजे रोज रात्री वेळेवर झोपणे आणि सकाळी ही वेळेवर उठणे या गोष्टी आत्मसात करा. हळू हळू सवय लाऊन घेतली ही या गोष्टीची तुम्हालाही सवय होईल. झोप येण्यासाठी रूम मध्ये जास्त उजेडही नको आणि संपूर्ण अंधार ही नको कमी उजेडाचा बल्ब लावावा. तुम्हाला रात्री असिदिटीचा त्रास रोज होत असेल तर रात्री जेवण न करता एक ग्लास दूध पिऊन झोपावे.
खूप प्रयत्न करून झोप लागत नसेल तर पुस्तक वाचावे वाचताना नक्कीच तुम्हाला झोप येईल. रात्री जास्त उशिरा पर्यंत मोबाईल किंवा टीव्ही बघणे टाळावे त्यामुळे ही तुमच्या झोपेचे खोबरे होते. झोपण्यापूर्वी थोडा वेळ बाहेर शतपावली करून यावे यामुळे शरीर थकल्यामुळे ही तुम्हाला झोप येण्यास मदत होईल.