Home संग्रह तृतीय पंथीयाची अंत्ययात्रा आपण पाहिली तर काय होते?

तृतीय पंथीयाची अंत्ययात्रा आपण पाहिली तर काय होते?

by Patiljee
4270 views

जन्माला आलेला प्रत्येक जीव मरतोच. निसर्गचक्र कोणाला ही चुकवता आले नाही. तृतीयपंथीयही याला अपवाद नाहीत. मात्र तृतीयपंथिय लोकांचे आयुष्य हे खडतर परिस्थिती मधून घडत असते. परंतु जिवंत असताना सामान्य माणसांप्रमाणे त्यांचे आयुष्य ‘सामान्य’ मात्र नसते. आता काही प्रमाणात जरी परिस्थिती बदलली असली तरी मात्र तृतीयपंथी लोकांचे आयुष्य आजही कित्येक हालपेष्टांमध्ये घडत असते. उभ्या आयुष्यात उपेक्षा, हेटाळणी, हक्कांपासून वंचना, बदनामी अश्या अनेक संकटांतून ही मंडळी जातात. त्यांच्या आयुष्यातील दुःखांना मात्र मर्यादा नसते. लहानपणी पासून ते मृत्यूपर्यंत प्रत्येक ठिणकी संघर्ष यांच्या माथी लिहिलेला असतो. अगदी मृत्यूनंतर देखील विटंबना पाचवीला पुजलेली. जेव्हा एखाद्या तृतीयांचा मृत्यू होतो तेव्हा त्यानंतर त्या व्यक्तीची या जन्मातून सुटका मिळाल्या बद्दल आनंद व्यक्त केला जातो. ती व्यक्ती गेली म्हणून शोक केला जात नाही तर त्याला पुढील जन्म हा सामान्य स्त्री किंवा पुरुषाचा मिळावा यासाठी प्रार्थना केली जाते.

त्यांना अर्थार्जनाच्या संधीही अनेक वर्षे उपलब्ध नव्हत्या. लोकांकडून पैसे मागून त्यांचा उदरनिर्वाह चालत असे. शिक्षणाच्या, स्वयंपूर्णतेच्या संधीही त्यांना मिळत नसत. हल्ली हळूहळू समाजात जागृती होऊ लागली आहे व त्यांच्या प्रश्नांना कुठेतरी वाचा फुटते आहे. पण तरीही एक माणूस म्हणून त्यांचे जीवन अजूनही खूपच कष्टप्रद व दुःखद असते. अनेक गोष्टी आहेत ज्यावर आजही खुलेपणाने बोलले जात नाही. या समाजाबाबत अनेक समज आहेत. जसे, त्यांना त्यांच्या मृत्यूची चाहूल मृत्यूपूर्वीच लागते. मग ते अन्नाचा त्याग करतात. केवळ पाणी पिऊन राहतात. काही बाबतीत कल्पना आल्यास असे होऊ शकते.

मात्र ते ही सामान्य माणसाप्रमाणेच असतात. त्यांच्याकडे काही सुपर नॅचरल पॉवर असते असे काही नाही. मात्र एखाद्या मनापासून दिलेल्या आशीर्वादाचा परिणाम नक्की होतो हेही खरे. मला वाटते आता पेक्षा आधीच्या काळी या समजला खूप जास्त प्रमाणात अपमान, हालपेष्टांमध्ये जीवन व्यथित कराव लागत होतं. याचमुळे यांना अर्थजनाच्या संधी उपलब्ध नव्हत्या, कुणी प्रेमाने त्यांना दक्षिणा दिली तर तो आर्शिवाद मनापासून असायचा. याचमुळे हा आशीर्वाद खरा होतो असेही म्हणतात. मग त्यांनी दिलेला आशीर्वाद असो वा श्राप.

जेव्हा कधी तृतीयपंथीय लोकं मरणाच्या दारात असतात, तेव्हा मृत्यूपूर्वी पुन्हा असे (तृतीयपंथीयांचे) जीवन मिळू नये, अशी प्रार्थना करतात. कोणीही आजारी असताना किंवा मृत्यूच्या दारात असताना मोठ्या प्रमाणावर शोक केला जात नाही. अशी एखादी व्यक्ती मृत्यू पावल्यास तिच्या जवळच्या वर्तुळाखेरीज अन्य कोणालाही या घटनेचा थांगपत्ता लागू दिला जात नाही. त्यांच्या समाजातील इतर व्यक्ती मृताचे दर्शन घेण्याकरिता येतात. या मृत देहाचे दर्शन मिळणे म्हणजे फार नशिबाची गोष्ट असते असेही म्हणतात. जेव्हा कधी कोणाचा मृत्यू होतो तेव्हा त्या मृतदेहाची विटंबना केली जाते. चप्पल बूट लाथांनी तो मृतदेह तुडवला जातो. असे केल्याने ही विटंबना देवापर्यंत पोहचेल आणि यापुढचा जन्म एक सामान्य व्यक्ती म्हणून मिळेल असा समज आहे.

मृतदेहाचे सर्व अंतिम विधी करे पर्यंत त्या देहाला झाडू, खराटा, चप्पल याने मारले जाते. व त्याला चप्पल-बुटांनी बडविले जाते. असे केल्याने त्याच्या पापांचा क्षय होतो व पुढचा जन्म ‘सामान्य’ (स्त्री किंवा पुरुषाचा) मिळतो अशी समजूत. मृतदेहाचे दहन केले जाते. समाजातील इतर मंडळी उपासतापास करतात व प्रेतास पुढील जन्म सामान्य माणसाचा मिळो अशी कामना करतात. मृताच्या मृत्यूचा शोक न करता जल्लोष केला जातो कारण उपेक्षितांचे जीवन हे नारकापेक्षा देखील वाईट असते. ते कोणाला हवेसे असेल बरे..!!
पुढचा जन्म मुळात असतो का हेच माहित नसल्याने त्याची चिंता करणे अर्थहीन आहे.

पुनर्जन्म ही केवळ एक संकल्पना आहे. तिला कोणताही शास्त्रीय आधार नाही. त्यामुळे पुढचा जन्म तृतीयपंथीयाचा, या विधानास कोणत्याही तर्काची बैठक उपलब्ध नाही. म्हणजेच या जडदेहाचा मृत्यू झाल्यावर, ते भस्मीभूत म्हणजेच दहन झाल्यावर येथे पुन्हा येणे नाही. हा जो अंत्यविधी असतो तो मध्यरात्री एक दोन वाजता पार पडला जातो. ती अंत्ययात्रा कोणालाही दिसणार नाही याची काळजी घेतली जाते. असे म्हणतात चुकीने का होईना कोणाला हा अंत्ययात्रेत दर्शन झाले तर हा अत्यंत शुभशकुन असतो. मात्र तसे पाहिले तर मृत्यू ही अतिशय सामान्य घटना आहे.

प्रत्येक जिवाच्या बाबतीत घडणारे हे अटळ सत्य आहे. आणि माणसाच्या जन्मी आलेल्या या प्राण्याचा मृत्यू पाहणे यात कसला शकुन आणि अपशकुन..!! त्यामुळे अशी अंत्ययात्रा चुकून किंवा मुद्दामून पाहिल्यास काय होईल? फारतर विधींमधले फरक पाहून थोडावेळ थोडे विचलित झाल्यासारखे होईल. जगाची रीत पाहून मन ढवळून निघेल. थोड्या विचित्र आणि सर्वत्र न आढळणाऱ्या पद्धती पाहिल्याने किंचितसे चक्रावून गेल्यासारखे होईल. पण यापलीकडे कोणताही परिणाम होणार नाही . मात्र नुकत्याच कळत्या वयात पाऊल ठेवणाऱ्यांसाठी ही गोष्ट काहीशी मन विचलित करणारी ठरू शकते.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल