Home संग्रह ही आहेत महाराष्ट्रातील सर्वात सुंदर ठिकाणे इथे फिरायला जायला सर्वानाच आवडेल

ही आहेत महाराष्ट्रातील सर्वात सुंदर ठिकाणे इथे फिरायला जायला सर्वानाच आवडेल

by Patiljee
1334 views

भारतात अशी काही ठिकाणे आहेत जिथे जाताच तुमचे मन एकदम प्रफुल्लित होईल आणि हे खरे आहे आपण बाहेर च्या देशात फिरायला जातो पण एकदातरी महाराष्ट्रातील या सर्वात सुंदर अशा ठिकाणांना भेट द्या. काही ठिकाणी सुंदरता तर काही ठिकाणी ऐतिहासिक वास्तू पाहायला मिळतील आणि हे पाहून खरंच मनाला एकप्रकारचे समाधान मिळते. तर आज आपण पाहूया महाराष्ट्रातील अशी दहा ठिकाणे ज्यांच्या विषयी जाणून घ्यायला तुम्हाला नक्की आवडेल.

अमरावती
महाराष्ट्रामध्ये उत्तर पूर्वेला स्थित अमरावती मधील देवांचा राजा इंद्र याचे शहर मानले जाते. या ठिकाणी अनेक ऐतिहासिक मंदिर, निसर्गाने वेढलेले अभयारण्ये हे पाहण्यासारखे आहे. तर इथे असणारे अंबा मातेचे मंदिर, श्री कृष्णाचे मंदिर आणि वेंकटेश्वर मंदिर संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. तसेच अमरावतीमध्ये असणारे बिर आणि साखर तलाव हे सुध्दा खूप प्रसिद्ध आहेत त्याचप्रमाणे अमरावती जिल्यातील चीकलधारा आणि धरनी तहसील या ठिकाणी असणारे टाईगर रिजर्व 1597 किमी क्षेत्रामध्ये पसरलेले आहे.

Source Google

नाशिक
हे शहर म्हणजे महाराष्ट्र राज्यातील तीर्थयात्रि साठी असणारे प्रमुख शहर होय. नाशिक शहरात भरला जाणारा कुंभ मेला हा येथील सगळ्यात मोठा आकर्षण आहे. त्याचप्रमाणे इथे 12 ज्योतिर्लिंग यांपैकी त्र्यंबकेश्वर हे एक देव स्थान इथे आहे.

Source Google

पुणे
पुणे हा महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी आणि क्‍वीन ऑफ द दख्खन’ या नावाने ओळखला जातो. पुण्यामध्ये प्रसिद्ध शनिवार वाडा महाल आहे जो पेशवा यांचे निवास स्थान होता. पहिल्या बाजीराव रावाने 1730 चा पाया घातला होता. तसेच या ठिकाणी आगा खान हा महाल सुद्धा आहे याची निर्मिती 1892 मध्ये तिसरा इमाम सुल्तान मोहम्मद शाह आगाखान त्यानंतर 1969 ला हे चौथा आगा खान याने भारत सरकार कडे सोपवले.

Source Google

मुंबई
महाराष्ट्र राज्याची राजधानी म्हणून मुंबईची प्रसिद्धी भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात आहे. या शहरातील सौदर्य पाहण्यासाठी विदेशातून परदेशी येतच असतात. तसेच मुंबईला महाराष्ट्र राज्याची आर्थिक राजधानी ही म्हणतात त्याचप्रमाणे मुंबईमधे पाहण्यासारखी बरीच अशी ठिकाणे यात त्यात गेटवे आफॅ इंडिया, हाजी अली, जूहू बीच, जोगेश्‍वरी गुफा, हैंगिंग गार्डन, सिद्धिविनायक मंदिर, मरीन ड्राइव ही काही महत्त्वाची ठिकाणे आहेत.

Source Google

रत्नागिरी
रत्नागिरी हा संपूर्ण निसर्गाने वेढलेला आहे येथील नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासारखे आहे लांबलचक समुद्रकिनारा तसेच बंदरे पाहण्यासारखे आहेत येथील थिवा महाल आणि रत्नागिरीचा किल्ला हे येथील प्रमुख आकर्षण आहेत. तसेच सहा मंदिरे, हजारो छोटे असे स्तूप तसेच अगणित मुर्त्या याचे अवशेष ही मिळाले आहे.

खंडाला
खंडाळा शहर हे मुंबई पासून 100 किलोमिटर लांब तर पुण्यापासून 70 किलोमिटर लांब आहे शिवाय येथून लोणावळा फक्त पाच किलोमीटर लांब आहे. खंडाळा घाट येथे अमृतांजन पॉइंट हा सगळ्यात सुंदर आकर्षणाचं ठिकाण आहे. येथील हिरवळ सुंदर घाट तुमचं मन नक्कीच बहरून टाकेल. येथे वूड पार्क मुख्य बाजारपेठेच्या मागे आहे. त्याचप्रमाणे जैविक उद्यान आहे. तसेच या उद्यानाच्या विरुद्ध बाजूला एक जुना इसाई कब्रिस्तान आहे.

Source Google

औरंगाबाद
औरंगाबाद येथील अजंठा आणि वेलुर लेणी प्रसिद्ध आहेत तसेच येथील बिबिका मकबरा ही बघण्यासारखा आहे. औरंगजेबाने आपले शेवटचे दिवस इथेच घालवले होते. आणि याच ठिकाणी त्याचा मृत्यू झाला होता. त्याचप्रमाणे येथील पाणचक्की ही प्रसिद्ध आहे.

Source Google

दौलताबाद
हा शहर औरंगाबाद जिल्ह्यात येतो येथे देवगिरी या नावाने ही संबोधण्यात येते या ठिकाणी खूप जुन्या काळच्या ऐतिहासिक इमारती आहेत ज्या मध्ये जामा मस्जिद, चांद मीनार, चीनी महल और दौलताबाद किल्ला हे ही सहभागी आहेत.

Source Google

महाबळेश्वर
हा थंड हवेसाठी प्रसिद्ध असा हील स्टेशन आहे तो सातारा जिल्ह्यात आहे त्याचप्रमाणे इथे महाबलेश्वर कृष्णा भाई मंदिर, 3 मंकी प्वॉइंट, वेन्ना झील, लिंगमाला वॉटरफॉल, Kate’s Point, विलसन प्वॉइंट, ही ठिकाणे प्रसिद्ध आहेत त्याचप्रमाणे महाबलेश्वर येथून जवळच प्रतापगड हा किल्ला ही पाहायला मिळेल.

Source Google

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल