तोंड येणे म्हणजे काय तर तोंडातील आतील भागात म्हणजे ओठांवर छोटे आणि मोठे अशा वेगवेगळ्या आकाराचे फोड येतात आणि हे फोड आल्यावर मात्र काहीच खायची किंवा प्यायची इच्छा होत नाही इतका त्रास होतो. याला तोंड येणे असे म्हणतात. आता तोंड कशामुळे येत असेल तर त्यासाठी तुमचे आहार कारणीभूत आहे. अति जागरण, मानसिक ताण तणाव, शारीरिक हार्मोनल बदल, ब- १२ जीवनसत्वाची कमतरता, तोंड नीट साफ न करणे, तोंडाची आतील त्वचा दाताखाली सापडणे, जास्त प्रमाणात मसालेदार व तिखट खाणे, दारूचे जास्त सेवन करणे, किंवा काही जणांना आजारी असल्यावर ही तोंड येण्याची समस्या निर्माण होते. म्हणून आज आपण तोंड येणे यावर घरगुती उपाय काय आहेत हे पाहणार आहोत जेणेकरून आजार घरच्या घरीच उपचार करून पळून जाईल
- पहिल्या प्रथम सांगायचे तर तुम्ही भरपूर पाणी प्या यामुळे तुमचे पोट नेहमी साफ राहते पोटातली घाण निघून जाते आणि त्यामुळे आजारपण आपल्यापासून लांबच राहतात.
- एका टोपात पाणी गरम करा या पाण्यात मीठ मिसळा आणि हे पाणी कोमट असताना या पाण्याने रोज बरे वाटेपर्यंत गुरल्या करा. दिवसातून तीन ते चार वेळा हा उपाय करा त्यामुळे तुम्हाला लवकर आराम मिळेल.
- महत्वाचे म्हणजे तुळस, आपल्या घरात एक गरजेचे रोपटे आहे. तुळस बऱ्याच आजारांवर उपयोगी आहे. या तुळशीची पाने तोंडात घालून तो चावा आणि त्या पांनांचा रस पिऊन टाका.
- धने घेऊन ते पाण्यात उकळा आणि या पाण्याने गुळण्या करा नक्की फरक पडेल.
- तुमच्या तोंडात ज्या ठिकाणी हे फोडे आलेले असतील त्या ठिकाणी हळद लावा. त्यामुळे लवकर फरक जाणवेल. हळदी मध्ये अँटी सेप्टिक गुण असतात हे तुम्हाला माहीतच आहे.
- एक लिंबू पिळा त्यामध्ये थोड मध मिसळा आणि हे मिश्रण फोड आलेल्या ठिकाणी लावा.
- पेरूची पाने घ्या ही पाने पाण्यात उकळा आणि या पाण्याने गुळण्या करा.
- खाण्याचे पान वाटा किंवा हाताने कुस्कुरा आणि त्यातील रस काढा हा रस आणि आपले गावठी तूप मिसळा आणि फोड आलेल्या ठिकाणी लावा लवकर आराम मिळेल.
- शिवाय मेडिकल मधे ब जीवनस्तव च्या गोळ्या मिळतात आणि जेल ही लावायला मिळते.
नक्कीच तुम्हाला ह्या उपायांचा फायदा होईल.