Home कथा आता मी काय करू? मला उत्तर हवंय

आता मी काय करू? मला उत्तर हवंय

by Patiljee
6448 views
मी

आज ती परत एकदा समोर आली. मी तिच्याकडे निरखून पाहत होतो. पण ती जसजशी जवळ आली तेव्हा माझी मान आपोआप खाली गेली. मी आठवडाभर तिला रोज पाहतोय. नवीन एडमिशन होत तिचं. आमच्याच इंजिनिरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. मी तिच्याबद्दल थोडी चौकशी केली तर माझ्या एका मित्राच्या गर्लफ्रेंडची ती मैत्रीण निघाली. मी त्याकडून तिची सर्व माहिती काढून घेतली. नाव काय? कुठे राहते? घरी कोण असते? कुणी प्रियकर आहे का? अशी सर्वच माहिती विचारून घेतली.

माझ्या बरोबर अजुन चार पाच मुलं तिच्या पाठी आहेत. हे ही मला तेव्हा कळलं होतं. मी आता फक्त तिला रोज पाहत होतो. तिनेही एकदोन वेळा माझ्याकडे पाहिलेच असेल असा माझा तरी अंदाज होता. तिच्याशी जवळीक साधण्यासाठी मी तिच्याच वर्गातील एका मित्रासोबत ओळख निर्माण केली. त्यामुळे मला तिच्या वर्गात जाता यायचे. तिला पाहता येत होते. पण इथेच खरतर माझं चुकलं. कारण त्या मित्राने माझ्याबद्दल तिला चुकीच्या गोष्टी सांगितल्या होत्या. मला सेमीस्टर मध्ये पँटर आहेत, मी मद्यपान करतो, मुली फिरवतो. ह्यामुळे तिच्या नजरेत मी बोलण्याआधीच उतरलो होतो.

समोर बोलायची हिम्मत नसल्याने मी आता माझा मोर्चा ऑनलाईन साईडकडे वळवला. मी तिला इन्स्टावर अनेक वेळा रिक्वेस्ट पाठवली. पण तिने ती स्वीकारलीच नाही. एक महिना गेला तरी काहीच घडत नव्हतं. अखेर एक दिवस तिने माझी रिक्वेस्ट स्वीकारली आणि मला मेसेज केला. तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस होता असे मी मानतो.

आता आमच्यात गप्पा होऊ लागल्या होत्या. पहिल्या दिवशी आम्ही एकमेकांबद्दल विचारले दुसऱ्या दिवशी कुटुंबाबद्दल बोलणे झाले. मग आमचे बोलणे सुरूच राहिले. असेच काही दिवस खूप छान गेले. ह्यात आमच्या सेमीस्टरचा रिझल्ट लागला. मला एक बॅक पडला होता. तिने मला विचारले तर जे आहे ते मी खर खर सांगितले पण त्या दिवसापासून तिचा रिप्लाय आला नाही. काही दिवसात तिचा रिप्लाय आला माझाही एक बॅक पडला. तिचा खूप मुड ऑफ झाला होता. मी तिला खूप समजावले पण ती ऐकायला तयार नव्हती. तिने ह्या गोष्टीचे टेन्शन घेतले होते.

त्याच रात्री तिने मला ब्लॉक केलं. का केलं ह्याचे कारण आजही मला कळत नाहीये. मला तिच्याशी बोलण्याची थोडी सवय झाली होती. मला अजिबात करमत नव्हते. म्हणून मी दुसऱ्या अकाउंटवरून मेसेज केला. पण तिने तो ही अकाउंट ब्लॉक केला. माझे नक्की कुठे चुकले आहे हेच मला कळत नव्हते. काय करू काहीच उमगत नव्हते. एक दिवस कॉलेज मध्ये मी तिच्या समोर गेलो आणि बोलू लागलो. तर खूप छान बोलली. असे आमच्यात काही झाले आहे असे वाटलेच नाही.

आम्ही छान गप्पा मारल्या. तिने मला ब्लॉक का केलं? ह्याचे कारण विचारले तर ती बोलली सहज केलं आहे. ती तिथून निघून गेली मात्र माझ्या डोक्यात अनेक प्रश्नांचां भंडार सोडून गेली. का वागत आहे ती अशी अजुन मला कळत नव्हतं. असेपण नव्हते की आमचे प्रेम आहे. मी तिला लाईक करत होतो पण कधी विचारले सुद्धा नव्हते. तरीही ती अशी का करते मला कळत नव्हते.

त्यांनतर जेव्हा जेव्हा ती समोर यायची मी तिच्याशी बोलायला जायचो. पण आता मात्र ती माझ्याकडे दुर्लक्ष करत होती. माझ्याकडे बघत सुद्धा नव्हती. मला खूप त्रास होत होता. दोन अकाउंट ब्लॉक असून सुद्धा मी तिसऱ्या अकाऊंटवरून तिला एकतर्फी मेसेज करत होतो. पण तिचा काहीच रिप्लाय येत नव्हता. ह्यात भर म्हणून तिच्या मागे जी मुलं होती त्यांनी कॉलेजमध्ये अशी बातमी पसरवली की मी तिला मेसेज करून त्रास देतोय. त्यामुळे माझी सुद्धा कॉलेजमध्ये खूप बदनामी झाली.

मला बदनामी झाले ह्याचे दुःख नव्हते. पण मी असे काहीच करत नाहीये असे तिने कुणालाही सांगितले सुद्धा नाही. ह्याची जास्त खंत वाटत आहे. आता मी काय करावं? हेच मला सुचत नाहीये. तुम्ही मला कमेंट करून मार्गदर्शन देऊ शकता का?

मित्रानो ही एक आपल्याच पेज वरील मुलाची सत्यकथा आहे. सर्वांनी तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा. नक्की ह्यात चुकी कुणाची आहे? पुढे काय करावे?

पाटीलजी

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल