काही लोकांना नियमित फळ खाण्याची सवय असते पण फळांची साल आपण फेकून देतो. पण काही फळांच्या सालीमध्ये असे गुणधर्म असतात की त्यामुळे आपल्या शरीरासाठी खूप फायदा होतो. पण ते जाणून न घेता तुम्ही साल फेकून देता. अशीच एका फळाची म्हणजे केळीची साल खूप उपयोगी आहे. याचा तुम्ही कधी विचार ही केला नसेल तर आज आपण पाहूया केळा या फळाच्या सालीपासून तुम्हाला कोणकोणते उपयोग मिळतात.
केळीची साल ही आपल्या चेहऱ्यावर साठी खूप उपयोगी आहे. आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या हे आपल्याला नेहमी म्हातारे झाल्याचे सांगत असतात. या सुरकुत्या पासून सुटका मिळण्यासाठी केल्याचा सालीची आतील बाजू चेहऱ्यावर थोडा वेळ घासा आणि २० ते ३० मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवा सुरकुत्या कमी होण्यास मदत होईल.
केळीची साल ही आणखी एकावर खूप फायदेशीर आहे ते म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर किंवा कोणत्याही भागात येणारी चामखीळ कोणालाच नको असते मग ती घालवायची कशी हा प्रश्न सर्वानाच पडलेला असतो. यासाठी केळ्याची साल त्या चामखीळ वर सतत घासा त्यामुळे चामखीळ हळू हळू दबली जाते.
लेदरच्या वस्तूंवर म्हणजे तुमच्या रोजच्या वापरातील बॅग, शूज यांसारख्या वस्तूंवर केळ्याची साल घासा. अशा वस्तू पुन्हा नव्याने चमकू लागतील.
तसेच केळ्याच्या साली मध्ये कोरफडचे जेल मिसळा आणि हा पॅक चेहऱ्यावर लावा यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचे डाग निघून जातील. तसेच डोळ्या खालची काळी वर्तुळे ही जायला मदत होईल.
केळीची साल ही मध माशी किंवा एखादा किडा चावल्यास ही त्याचा उपयोग होतो. त्या जागी केल्याची साल बारीक करून लावल्याने लवकरच आराम मिळतो.