सध्या लॉक डाऊन मुळे सिने जगत सुद्धा ठप्प पडलं आहे. नवीन सिनेमे तयार होऊन प्रदर्शनाच्या वाट्यावर उभे आहेत पण निर्मात्यांना ते प्रदर्शित करता येत नाहीत. जरी हे लॉक डाऊन संपले आणि सर्व शांत झाले तरी लोकं गर्दी करून टॉकीज मध्ये सिनेमा पाहायला लवकर तरी जाणार नाहीत. म्हणूनच काही निर्मात्यांनी हे सर्व प्रकरण थांबण्याची वाट न पाहता आपले सिनेमे ऑनलाईन प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.
हे सिनेमे ओटीटी वर प्रदर्शित होतील. ओटीटी म्हणजे ओव्हर द टॉप मीडिया सर्व्हिस म्हणजेच सोप्या भाषेत ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर हे सिनेमे प्रदर्शित होणार. अमेझॉन प्राईम हे प्लॅटफॉर्म असे सिनेमे प्रसारित करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच पाच सिनेमा बद्दल सांगणार आहोत जे ह्या प्लॅटफॉर्म वर प्रसारित होतील.
शकुंतला देवी
विद्या बालन मुख्य भूमिकेत असलेला हा सिनेमा गणितद्य शकुंतला देवी ह्यांच्या आयुष्यावर आधारित आहे. त्यांना ह्युमन कॉम्प्युटर म्हणून सुद्धा ओळखले जाते. हा सिनेमा तुम्हाला अमेझॉन प्राईमवर ह्या महिन्यात प्रदर्शित होणार आहे. ह्या सिनेमाचे दिग्दर्शन अनु मेनन ह्यांनी केलं आहे.
गुलाबो सिताबो
हा सिनेमा सामान्य माणसाच्या जीवनावर प्रकाश टाकतो. सिनेमा हसवून हसवून समाज प्रबोधन सुद्धा करणार आहे. ह्या सिनेमात पहिल्यांदाच अमिताभ बच्चन आणि आयुष्यमान खुराणा एकत्र दिसणार आहेत. हा सिनेमा १२ जून रोजी प्रदर्शित होईल.
पेंग्विन
कीर्ती सुरेश ह्या सिनेमात तुम्हाला दिसणार आहे. ह्या सिनेमाचे दिग्दर्शन ईश्वर कार्तिक ह्यांनी केले आहे. हा सिनेमा तुम्हाला १९ जून रोजी तमिळ तेलगू भाषेत पाहायला मिळेल.
पोनमागल वंधाल
पोनमागल वंधाल हा सिनेमा एक लीगल ड्रामा आहे. ह्या सिनेमात खूप वर्षांनी ज्योतिका मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. तिच्यासोबत भाग्यराज, पंडियाराजन, पार्थिबनआणि प्रताप पोथेन ह्यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा सिनेमा २९ मे रोजी तुम्हाला तमिळ भाषेत पाहता येईल.
सूर्यवंशी
रोहित शेट्टी अक्षय कुमार ह्यांचा बिग बजेट सूर्यवंशी हा सिनेमा २४ मार्च रोजी प्रदशिर्त होणार होता. पण सध्या अशा चर्चेला उधाण आहे की हा सिनेमा ऑनलाईन रिलीज करण्यात येण्यात आहे. पण ही बातमी खोटी आहे. ह्या सिनेमाच्या निर्मात्यांनी अजुन तरी आम्ही असा काही निर्णय घेतला नाहीये असे स्पष्ट केले.