रायगड: वयाच्या अवघ्या अडीच तीन वर्षात तुम्ही काय करत होता? असा प्रश्न तुम्हाला कुणी केला तर त्याचे उत्तर सोडा तुम्ही कसे होता ते ही सुद्धा तुम्हाला आठवणार नाही. पण आज तुम्हालाही अभिमान वाटेल अशी बातमी हाती आली आहे.
अलिबाग मधील लोणार ह्या गावातील शर्विका जितेंन म्हात्रे ह्या चिमुरडीने अशी काही कामगिरी करून दाखवली आहे जी आपल्याला ह्या वयात सुद्धा जमणार नाही. तिने इवल्याश्या वयात सर्वात लहान गिर्यारोहक म्हणून महाराष्ट्राचे आणि स्वतःचे नाव लौकीक केलं आहे.
शर्विकाला आशिया बुक ऑफ रेकॉर्डने ग्रँड मास्टर ही पदवी देऊन गौरवले आहे. वयाच्या अवघ्या अडीच ते तीन वयोगटात मान मिळवणारी महाराष्ट्रातील ही पहिलीच घटना आहे.
एवढा मानाचा पुरस्कार तिला का देण्यात आला?
कलावंतीण सुळका ह्या महाराष्ट्रीय अतिशय कठीण सुळका तिने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सर केल्या होत्या. एवढेच काय तर तिने ह्या सुळका सर करून तिथे भगवा मोठ्या अभिमानाने फडकावला होता.

ह्या सर्व गोष्टी पडताळून तिला तिच्या ह्या कार्यासाठी एवढा मोठा सन्मान करण्यात आला. तिने आपले आणि आपल्या रायगड जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. म्हणून तिचे सर्वच ठिकाणाहून कौतुक होत आहे.
जर तुम्हालाही तिचे व्हिडियो पाहायचे असतील तर यूट्यूब किंवा गुगलवर सर्च करुन पाहू शकता. तिने २०२० मध्ये १०० दिवसात १०० गडकिल्ले सर करण्याचा निर्धार केला होता. पण कोरोना महामारीने तिची ही मोहीम खोळंबली.
पण भविष्यात ती नक्कीच ही मोहीम पुन्हा सुरू करेल असे तिच्या पालकांनी सांगितले आहे.
हे पण वाचा