Home हेल्थ दात मजबूत राहावे यासाठी कोणती काळजी घ्यावी?

दात मजबूत राहावे यासाठी कोणती काळजी घ्यावी?

by Patiljee
1358 views

दात मजबूत राहावे यासाठी कोणती काळजी घ्यावी? आहार कसा असावा? याबाबत जागरूक राहणे केव्हाही चांगले. मुख्यत्वे आपल्याला अधिक माहिती असूनही आपण त्या गोष्टींचा जास्त विचार करत नाही. व्यवस्थित लक्ष न दिल्याने दातांच्या अनेक समस्या निर्माण होतात परिणामी त्रास शिगेला पोहोचल्यावर आपण त्यावर उपाय शोधायचा प्रयत्न करतो. हे मात्र तहान लागल्यावर विहीर खोदण्यासारखंच आहे.दाताची निगा व स्वच्छता राखणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. आपल्या शरीराचे ते प्रवेशद्वार आहे. दात, जीभ, ओठ यांचा दैनंदिन जीवनाशी संबंध आहे. दात मजबूत राहण्यासाठी,काही चांगल्या सवयी अवगत कराव्या लागतील व चहा पिण्यासारख्या आवडीच्या सवयी सोडव्या लागतील.ही चहा मुळे देखील काही प्रमाणात का होईना त्रासाला सामोरे जावे लागते. दाताततल्या किडीला वाढायला वाव मिळतो.

त्यामुळे गोड खाण्याच्या सवयी देखील दुर्लक्षित करणे फायद्याचे ठरेल. रात्री झोपताना कधीही गोड खाऊ नये खाल्लं तरी ब्रश करून झोपावे आणि शक्य नसेल तर कमीत कमी चूळ भरावी. याने दातांचे आरोग्य अबाधित राहायला मदत होते. आपल्या दातांना दररोज सकाळी आणि रात्री झोपायच्या आधी नियमित ब्रश करणे फार जरुरी आहे. दातांमध्ये दिवभराची घाण जमलेली असते त्यामुळे रात्री झोपण्याआधी ती घाण साफ करणे आवश्यक असते सकाळी ब्रश केल्याने दिवसभर मुखात दुर्गंधी राहत नाही ताजेतवाने वाटते.

आहारात दूध आणि दुधजन्य पदार्थ खावेत. दूध हे नक्किच दात मजबूत करेल. परंतु भरपुर साखर टाकून किव्वा चहा बनवून पिणे तितकेसे योग्य नाही. चहा ने भूक मरते ते वेगळेच मात्र दातांचे आरोग्य देखील धोक्यात येते. रोजच्या आहारात दातांच्या आरोग्यासाठी चांगली असलेली फळं असावीत.

सफरचंद, टोमॅटो , किवी, ऊस. जमेल तशी फळ खात चला, खायला जड जातील किंवा दाताने चाऊन खाता येतील असे काही खात चला जसे की खोबरे, खजूर, बदाम यांसारखे पदार्थ खायला देखील अतिशय उत्तम असतात आणि सोबतच भरपूर प्रमाणात लोह यात असतो. दाताने चावून चावून खाल्ल्याने दातांचा आणि हिरड्यांचा उत्तम व्यायाम होतो. रिकाम्या वेळेतील काड्या, काटा पिना, चावी, टूथपिक दातांमध्ये टाकण्याच्या सवयी फार वाईट असतात त्या बंद करा.  चिकट, गोड पदार्थ खाल्ल्यानंतर दात घासणं होत नसेल तर व्यवस्थित गुळणा करा. हे करणं जमत नसेल तर काही खाऊच नका. दात घासल्यावर तोंडात निर्माण होणाऱ्या लाळेमुळे पचनाची क्रिया सुरळीत पार पडते. त्यामुळे दातांची स्वच्छता करणे आवश्यक आहे. दातांमध्ये अडकलेलं अन्नच पुढे किडीचे कारण बनते. दररोज एक सफरचंद खाल्ल्यास डॉक्टरांना स्वत:पासून दूर ठेवणं शक्य होऊ शकते.हिरव्या भाज्या खाल्ल्यामुळे शरीरास रास बेटा केरोटिन मोठ्या प्रमाणावर मिळते.

त्यामुळे मिळालेले `अ` जीवनसत्व आपल्या शरीराला आणि दातांना बळकटी आणते. सफरचंदामुळे दातांचे आयुष्यमान वाढते. सफरचंदाचा रस पिण्यापेक्षा ते चावून खाल्ल्यास दातांचे आणि हिरड्यांचे आरोग्य सुधारते.आपल्या समोरच्या दातांचा उपयोग बॉटल्स ओपनर म्हणुन करणं टाळावं. एखादे दिवशी तुटून हातात येतील. नाही गम्मत नाही असे घडल्याची उदाहरणे देखील आहेत. दात तुटले नाही तरी हलू तरी शकतात. तहान लागण्यापूर्वी पाणी पिण्याची सवय असावी. यामुळे जास्त प्रमाणात लाळ तयार होऊन तोंडातील ph समतोल प्रमाणात राहतो. यावर देखील दातांचे आरोग्य जपायला मदत मिळेल.  दात घासल्यानंतर आपोआप हिरड्यावरून बोट फिरायला हवं जेणेकरून त्यांचा मसाज होऊन रक्ताभीसारण व्यवस्थित होईल. आणि दात देखील मजबूत होतील.

वेगवेगळ्या पदार्थातून आपण किती प्रमाणात साखर तोंडात कोंबतोय यावर लक्ष असायलाच हवं. गोड पदार्थांची सवय आपण इतकी लावून घेतो की आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवावर याचा परिणाम होतो. रात्री ब्रश केल्याशिवाय झोपणे बंद केले तर खूपच उत्तम.  दात अतिप्रमाणात दुखल्यानंतरच डेंटिस्ट ला भेट देणारे पेशंट सर्वाधिक असतात. जमेल तितकं अंगावर काढण्याची सवय मात्र भारतीयांच्या कडे अफलातून आहे. शरीराच्या कुठल्याही तक्रारारीची पहिली हाक जितकी लवकर ऐकणार तितकं चांगलं असेल.

 यूट्यूब वरील सल्ले ऐकुन दातांवर लिंबु सोड्याचे प्रयोग करु नका कारण हे सल्ले देणारी लोकं कुठल्याही प्रमाणित आधारावर बोलत नाहीत. फक्त तोंडी ऐकलेल्या गोष्टी घेऊन हे लोकं सल्ले देतात त्यामुळे या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा की वैज्ञानिक पुराव्या शिवाय कुठलीही गोष्ट स्वीकारु नाका.

तुमच्या जिभेवर २०अब्ज बॅक्टरीयाज असतात आणि जीभ तुमच्या दातांच्या शेजरीच असते हेच दुर्गंधी चे कारण बनते. म्हणून तोंडाच्या आरोग्याची काळजी घ्या. दूध, दही, चीज यांमधून कॅल्शिअम व फोस्फेरस मुबलक प्रमाणात मिळेल. दुधजन्य पदार्थ आहारात असुद्या आशा पदार्थांनी हाडे मजबूत होतात. कलिंगडाचे दोन काप दररोज खाल्ल्याने शरीरास जितकी `क` जीवनसत्वाची गरज असते, त्यातील २५ टक्के आणि जीवनसत्व यातून मिळते. हे जीवनसत्व दात आणि हिरड्या यांच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.  साखर नसलेलं च्विंगम खाल्ल्याने लाळ जास्त प्रमाणात तयार होऊन दातांवर बॅक्टरीयाज ची कॉलनी तयार होणार नाही. दातांवर बॅक्टरीयांचा थर साचत असतो.

ग्रीन टी मध्ये फ्लोराईड असल्याने हे दातांवरील बॅक्टरीयाज च्या कीड तयार करण्याच्या प्रक्रियेत अडथळा आणुन दातांना किडण्यापासून वाचवते. त्यामुळे दुधाच्या वाफाळत्या चहा पेक्षा ग्रीन टी पिणे जास्त फायदेशीर ठरते. अधूनमधून कोमट पाण्यात मीठ टाकुन गुळण्या करण्याची सवय देखिल दातांसाठी फायदेशीर ठरेल. कोमट पाणी हिरड्यांच आरोग्य अबाधित ठेवते शिवाय दुर्गंधी पासून अराम मिळतो.  पदार्थातील साखरेची जागा गुळाला दिली तर बराच फरक जाणवेल. जसे की, दुधात साखरे ऐवजी गूळ टाकण्याचे भरपुर फायदे तुम्हाला जाणवतील. गुळाचा चहा देखील उत्तम बनतो. एकदा पिऊन पहा फक्कड लागतो. वेळोवेळी फ्लॉस करणे, माऊथवॉश वापरणे, फ्लोराईड असलेलं टुथपेस्ट वापरात असणे अशी तोंडाची योग्य स्वछता ठेवली तर नक्कीच दातांच्या समस्या कमी होऊन दात मजबूत राहतील.

काही चांगलं व्हावं अशी अपेक्षा असेल तर काही चांगल्या सवयी लावायला हव्यात. आणि चांगल्या सवयी ठेवल्या तरचं आरोग्य अबाधित राहायला मदत मिळते.आपला माऊथवॉश मध्ये लीस्त्रीन व क्लोरिनची मात्र चांगली असायला हवी. ब्रश केल्यानंतर माऊथवॉश दातांना निरोगी बनवण्यास नक्कीच मदत होते. माऊथवॉश ने आपणास ताजेतवाने वाटते आपल्या मुखातून चांगला गंध येतो.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल