पहिल्याच सिनेमात यश संपादन करणाऱ्या अभिनेत्री मध्ये तारा सुतारीयाचे नाव सुद्धा जोडलं गेलं आहे. १० मे २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या स्टूडेंट ऑफ द इअर २ सिनेमात तिने बॉलीवूड मध्ये आपले पहिले पाऊल ठेवले. पहिल्याच सिनेमात हा गोड दिसणारा चेहरा लोकांना भावला. लाखो तरुण तिच्यावर फिदा झाले. ह्या सिनेमाने घवघवीत यश संपादन करत तारा सुतारीया आणि अनन्या पांडे ह्या दोघींनाही एका रात्रीत स्टार केले.
१९ नोव्हेंबर १९९५ मध्ये पारसी कुटुंबात तिचा जन्म झाला. तिला एक जुळी बहीण सुद्धा आहे तिचे नाव पिया आहे. ती एक प्रोफेशनल डान्सर सुद्धा आहे. तिने मॉडर्न डान्स, क्लासिकल आणि अमेरिकन डान्सचे प्रशिक्षण घेतले आहे. मास मीडियाची डिग्री सुद्धा तिने प्राप्त केली आहे. लहानपणापासून तिला अभिनय क्षेत्रात यायचं होतं. लहान असताना तिने २०१० मध्ये डिस्नीच्या बिग बडा बुम ह्या मालिकेत काम केलं होतं. द सूट लाईफ ऑफ करण अँड कबीर आणि ओये जस्सी ह्या मालिकेत सुद्धा तिने कामे केली होती.
खूप कमी लोकांना माहीत आहे की तिने सिनेमात येण्याअगोदर टेलिव्हिजन क्षेत्रात खूप कामे केली आहेत. एन्टरटे्मेंट के लिये कुछ भी करेगा, बेस्ट ऑफ लक निकी, शेक इट अप ह्या सारख्या शो मध्ये तिने योगदान दिलं आहे. मागच्या वर्षी प्रदर्शित झालेला हॉलिवुड मधील अलादिन सिनेमाच्या मुख्य अभिनेत्रीच्या यादीत ती दुसऱ्या क्रमांकावर होती. अखेर ही भूमिका नाउमी स्कॉट हिच्या पदरात पडली.
तरीही तारा ने खचून न जाता प्रयत्न चालूच ठेवले अखेर तिला स्टूडेंट ऑफ द इअर २ मध्ये संधी मिळाली. ह्याच संधीचे तिने सोनं केलं. ह्यानंतर ती सिद्धार्थ मल्होत्रा सोबत मरजावा ह्या सिनेमात दिसली. तिने आपल्या सहज आणि सुंदर अभिनयाने प्रेक्षकांचा मने जिंकली आहेत. सध्या तिचा लहानपणीचा फोटो आपल्या सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला आहे.