Home बातमी तनिष्कची व्हायरल जाहिरात आणि लव्ह जिहादचा पेटलेला वाद

तनिष्कची व्हायरल जाहिरात आणि लव्ह जिहादचा पेटलेला वाद

by Patiljee
1568 views
tanishq ad controversy

फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगातच जाहिरात क्षेत्र हे कसं वर आलं आहे ते आपण अनुभवलं आहेच. प्रत्येक छोट्या मोठ्या उद्योगाला जाहिरात ही अत्यंत गरजेचा विषय बनली आहे.आणि आता तर सोशल मीडियाच्या माध्यमातून मार्केटिंग इतकं पुढे गेलं आहे की ह्या जाहिरातींच्या माध्यमातून पैसा कमावणं सुद्धा अगदी सोप्पं होऊन बसलंय! अगदी पूर्वीच्या काळापासूनच हे चालत आलं आहे. पूर्वी रामायण लागलं की tv वर धाडी पडायच्या DD नॅशनल बघायला जुन्या काळात जेंव्हा टेलिव्हिजन नवीन नवीन आला तेंव्हा टीव्हीवर येणारी पारले-जी, अमूल, निरमाची जाहिरात आपल्याला ठाऊक असेलच! जुन्या जाहिराती लज्जत पावड आणि ससा साबण आशा कित्येक आठवणीतल्या जाहिराती आहेत. काळानुसार त्या बदलत गेल्या. स्वरूप बदलत गेल, सध्या अशाच एका जाहिरातीची चर्चा रंगताना दिसत आहे.

असाच एक भन्नाट किस्सा सध्या सोसिल मीडिया वर रंगला आहे. तनिष्कच्या जाहिरातीला लोकांनी एवढं धारेवर धरल की त्याची एवढी मोठी बातमी बनली. लोकांच्या चर्चेला उधाण आलं. काही दिवसांपूर्वी तनिष्कने नवीन जाहिरात काढली होती. ह्या जाहिरातीत एका हिंदू मुलीने मुस्लिम मुलाशी लग्नं केलं असून त्या मुलीचा डोहाळे जेवणाचा सोहळा हिंदू परंपरेनुसार पार पाडताना दाखवला जात आहे. मुळात यात हिंदू मुस्लिम ऐक्य किंवा सर्वसमावेशकता दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. कोणाच्या भावना दुखावण्याचा कोणताही प्रयत्न नव्हता असे सांगण्यात येऊनही यावर भयंकर बाचाबाची झाली. आजही ह्या गोष्टीवरून बरेच वाद होत असतं, लोकांचे मतभेद समोर येत असतात. त्यापैकीच एक उदाहरण म्हणजे नुकतीच रिलीज झालेली ही जाहिरात.

अलीकडे, तनिष्क या ज्वेलरी ब्रँडला त्यांची नवीन जाहिरात सोशल मीडियावरून हटवावी लागली. या जाहिरातीतून लव्ह जिहादला प्रोत्साहन देण्यात आली असल्याची टीका अनेकांनी केली. या जाहिरातीवरून एवढा वाद निर्माण झाला की तनिष्कने जाहिरात काढून टाकण्याचा निर्णय घेतला.४३ सेकंदाच्या या जाहिरातीत एक गर्भवती हिंदू महिलेच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम तिच्या सासरी मुस्लिम कुटुंबात सुरू असतो. जाणीवपूर्वक हिंदू मुलगी आणि मुस्लिम मुलगा दाखवल्याची टीका नेटकऱ्यांकडून करण्यात आली. यानंतर तनिष्क कंपनीने जाहिरात मागे घेण्याचा निर्णय घेतला.

ही जाहिरात पाहून सर्वसामान्य लोकांनी याविषयीची खदखद सोशल मीडिया वर व्यक्त करायला सुरुवात केली, आणि एकंदरच हा विषय खूप तापत चालला आहे. आता लोकांनी यातून हिंदू धर्माचा अपमान होत आहे किंवा लव्ह जिहाद अस काही दाखवलं गेलं आहे असा दावा केला.  अनेकांनी या जाहिरातीमुळे हिंदू संस्कृतीचा अवमान होत असल्याचा दावा केला. कित्येकांनी अशा जाहिरातीतून ‘लव्ह जिहाद’चा प्रचार अशा माध्यमातून होत आहे असा केला आरोप आहे . काही वर्षांपूर्वी केरळमध्ये मुस्लिम तरुणाने हिंदू तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून विवाह करुन नंतर तिचे धर्मपरिवर्तन केल्याचे अनेक प्रकार समोर आले. या प्रकाराला ‘लव्ह जिहाद’ संबोधले जाते. सन 2009 पासून अशा प्रकाराविरुद्ध हिंदू संघटनांनी हिंदू समाजात जागृतीचा कार्यक्रम सुरू केला आहे. तेव्हापासून ‘लव्ह जिहाद’ हा विषय चर्चेत आहे

हे पण वाचा

तब्बल ७५ वर्षांनी फुटलेला बॉम्ब आणि दुसऱ्या महायुद्धाच्या पाऊल खुणा

त्यामुळे गांधीधाम ह्या गुजरात मधल्या एका तनिष्कच्या ज्वेलरी शोरूमच्या बाहेर याबद्दल खेद व्यक्त करत एक फलक लावला गेला ज्यात त्यांनी या प्रकरणाबद्दल जाहीर माफीदेखील मागितली आहे!  मुळात जाहिरात बनवतांना आशा प्रकारे वादंग होईल याची पुसटशी ही कल्पना नसावी. एका सर्वसमावेशकता आशा ट्रँगल मधून पाहत ही जाहिरात बनविण्यात आल्याचं तनिष्क ने जाहीर केलं. मात्र नेटकऱ्यांनि याला धर्माला धक्का आहे असं मनात नवीन प्रकरण उभं केलं.  तर हा वादंग पेटल्यानंतर या जाहिरातीचं प्रसारण थांबविण्यात आले आहे.  या विषयी एवढा वाद होण्याचं एकच कारण की जाहिरात प्रक्षेपित झाल्यावर अनेक धार्मिक वाद निर्माण करण्यात आले. या जाहिरातीमुळे हिंदू संघटनांचा नेहमीच मांडला जाणारा लव्ह जिहादचा मुद्दा नव्यानं चर्चेत आला आहे.

त्यांनंतर समाजातल्या विविध स्तरांमधून अनेक प्रकरणं बाहेर यायला लागली आणि हळू हळू ह्या सगळ्या प्रकाराने एक वेगळंच धार्मिक आणि राजकीय वळण घेतलं! सोशल मीडिया वर लोकं वाटेल तशी आपली मतं व्यक्त करत असतात. आपलं मत मांडणे काही वाईट गोष्ट नाही मात्र तरीही या प्रकारच्या घटनेने धर्म ,धर्मांतरण , आणि त्यावरून तापलेले राजकारण या भोवती फिरायला लागली. काँग्रेस नेते शशी थरूर यांनी या विषयात उडी घेत ट्रोलर्स ला चांगलेच सुनावले. व्हिडीओ जाहिरातीनंतर आंतरधर्मीय लग्नाच्या मुद्द्यावर जोरदार चर्चा होत आहे. तनिष्कच्या जाहिरातीत असंच एक लग्नाचं उदाहरण दाखवल्यानंतर त्यावर बहिष्काराची भाषा झाली. शशी थरुर यांनी याच मुद्द्याला हात घालत बहिष्कार घालण्याची धमकी देत ट्रोलिंग करणाऱ्यांना ‘सर्वसमावेशक भारताची’ आठवण करुन दिली. सोबत त्यांनी जारा फारुकी यांच्या आंतरजातीय विवाहाचे उदाहण देत ट्रोलर्स ना सुनावले.

या प्रकरणात जारा फारुकी यांनी ही आपल्या लग्नाचे आणि फोटो शेअर करत धर्मविषयक द्वेश पसरवू पाहणाऱ्या ट्रोलर्सला सांगितले. दोन्ही परिवाराने एकत्रित येऊन आनंदाने हे नाते स्वीकारले. आणि त्याच बरोबर आपल्या डोहाळे जेवणाचे ही फोटो शेअर केले आहे.  तनिष्क ज्वेलर्स सध्या सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल होत आहे. तनिष्क ज्वेलर्सने त्यांच्या एका जाहिरातीमध्ये लव्ह जिहादसारख्या गोष्टींना प्रसिध्दी दिल्याचा आरोप नेटिझन्सनी केला आहे. त्यामुळेच सोशल मीडियावर याचा प्रचंड निषेध करण्यात येत आहे. या ट्रोलिंगनंतर तनिष्क ज्वेलर्स आपली जाहिरात मागे घेतली आहे.

तनिष्क जाहिरातीता नेमकं काय आहे ?

तनिष्क ज्वेलर्सच्या जाहिरातीत, एका हिंदू महिलेचे मुस्लिम घरात लग्न झाल्याचे दाखवले आहे. महिलेला दिवस गेल्याने तिच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम असल्याचे जाहिरातीत दाखवण्यात आले आहे. या जाहिरातीत मुस्लिम परिवार हिंदू धर्मपद्धतीनुसार डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आयोजित करतो. शेवटी गरोदर महिला आपल्या सासूला “मां ये रस्म तो आपके घर में होती भी नहीं है न?” असा प्रश्न करते. यावर सासू, “पर बिटिया को खुश रखने की रस्म तो हर घर में होती है न?” असे उत्तर देते. याच जाहिरातीविरोधात सोशल मीडियावर तनिष्क ज्वेलर्सला बॉयकॉट करा, असा ट्रेन्ड चालवला जातोय.

खरंतर ही जाहिरात दाखवण्यामागे लव्ह जिहाद हा उद्देश नसून हिंदू आणि मुस्लिम ह्या २ धर्मांचा संगम दाखवण्याचा उद्देश असल्याचं तनिष्कची मालकी असलेल्या टाटा कंपनीने स्पष्टसुद्धा केलं आहे. दरम्यान या सगळ्या प्रकारात कंगनाने ही उडी घेत ट्विट केलं आहे.  तनिष्क ज्वेलर्सच्या जाहिरातीतून लव्ह जिहादसारख्या प्रकाराला चालना दिल्याचा आरोप सोशल मीडियावर होत आहे. त्यामुळे ‘तनिष्क’ने ही जाहिरात यूट्यूबवरुन हटवली आहे. तनिष्कच्या या जाहिरातीवर कंगनानेही विरोध दर्शवला असून ट्विटरद्वारे आपला संताप व्यक्त केला आहे. एवढेच बोलून ती थांबली नाही तर या जाहिरातीबाबत कंगना म्हणाली, एक हिंदू म्हणून आपण आपल्या मनोवृत्तीत असे बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद्यांच्या या कलात्मक शैलीपासून आपणही दूर राहिले पाहिजे. आपण आजूबाजूच्या प्रत्येक विचारांची तपासणी करणे आणि अशा विचारसरणीचा आपल्यावर किती प्रभाव पडू शकतो आणि आपण आपले किती नुकसान करु शकतो. हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणे खूप महत्वाचे आहे.

लखपती व्हायचंय? मग ५ आणि १० रुपयाची नाणी विका आणि श्रीमंत व्हा

“एका मुस्लिम कुटुंबात एका हिंदू धर्माच्या मुलीचे लग्न होते. मुलगी आपल्या सासूला घाबरलेल्या आवाजात विचारत आहे की, हा विधी इथे मानला जात नाही, मग पुन्हा असं का होत आहे? ती त्या घरातली नाही का? तिला हे का विचारायचे आहे. ती स्वत: च्या घरात इतकी गोंधळलेली का दिसत आहे”. कंगना इथेच थांबली नाही. तर तिने या विषयावर आणखी दोन ट्विट केले. ही जाहिरात अनेक अर्थांनी चुकीची आहे. या जाहिरातीमध्ये केवळ लव्ह जिहादलाच प्रेरणा दिली जाते असं नाही तर लिंगभेदालाही प्रोत्साहन दिले जात आहे”. पण एकंदरच सोशल मीडिया वर होणारा लोकांचा विरोध पाहता त्यांनी गुजरातमधील एक दुकानात बोर्ड लावून जाहीर माफी मागितली असून, ही जाहिरात त्यांनी मागे घेतलेली आहे!

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल