सर्वकडे सध्या तान्हाजी द अंनसंग वॉरियर ह्या एकाच सिनेमाची जोरदार चर्चा आहे. तुम्ही कोणत्याही सिनेमागृहात जा तुम्हाला हाऊसफुलचे बोर्ड पाहायला मिळतील. बऱ्याच वर्षांनी असे दिसतेय की एका इतिहापसपट चित्रपटासाठी एवढी गर्दी जमत आहे. ह्याचे कारण म्हणजे आपण लहापणापासून ज्या आपल्या तान्हाजी मालुसरे ह्यांचा इतिहास वाचत आलो आहोत तोच इतिहास भव्यदिव्य पद्धतीने 3D मध्ये पाहायला मिळतोय ह्यापेक्षा सुंदर काय असावं. खरंच ह्या साठी ह्या चित्रपटाचे सर्व टीमचे मनापासून आभार मानले पाहिजे.
सर्व अभिनेत्यांनी केलेला अभिनय, उत्तम दिग्दर्शन, बॅकग्राऊड साऊंड, कथेची मांडणी आणि VFX ह्यामुळे हा चित्रपट सर्व ठिकाणी भाव खाऊन जातो. आपण हा सिनेमा चित्रपटगृहात जाऊनच पहावा अशी तुम्हा सर्वांना विनंती करेल. कारण असा आपला इतिहास डोळ्यासमोर घडत असताना अंगावर जे शहारे येतात ह्याचा अनुभव तुम्हाला चित्रपटगृहातच मिळेल. दिग्दर्शक ओम राऊत ह्यांनी ह्या सिनेमासाठी केलेली पाच वर्षाची मेहनत तुम्हाला दिसून येईल.
अजय देवगण आणि सैफ अली खान ह्यांनी आपल्या अभिनयाने अक्षरशः चार चांद लावले आहेत. उदयभान सिंग राठोड म्हणून सैफने आपल्या करीयर मधील सर्वात बेस्ट रोल दिला आहे. ह्या सिनेमात मराठी कलाकारांची फौज सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. ह्यात शरद केळकर ने केलेली शिवरायांची भूमिका भाव खाऊन जाते. राजे कसे असावे ह्याचे उत्तम उदाहरण आपण शरद केळकर ला पाहताना अनुभवू शकतो. याचबरोबर देवदत्त नागे ह्यांनी सुद्धा आपल्या अभिनयाची चमक ह्या सिनेमात दाखवली आहे. उत्कृष्ट अॅक्शन सिन मध्ये तोही भाव खाऊन जातो.
देवदत्त ने तान्हाजी मालुसरे ह्यांचे छोटे बंधू सूर्याजी मालुसरे ह्यांची भूमिका साकारली आहे.
पण खूप कमी लोकांना माहिती आहे किंवा तुम्ही तिला पाहून सुद्धा ओळखली नसेल अशी एक मराठमोळी अभिनेत्री सुद्धा तुम्हाला ह्या सिनेमात पाहायला मिळत आहे. देवदत्त नागे म्हणजेच सूर्याजी मालुसरे ह्यांच्या पत्नीची भूमिका भाग्यश्री न्हालवे हिने केली आहे. ह्या आधी भाग्यश्रीला तुम्ही कलर्स मराठीवरील कुंकू टिकली आणि टेटू मालिकेत पाहिलेच असेल. परफ्यूम ह्या सिनेमात सुद्धा ती दिसली होती. याचबरोबर प्रसिद्ध मराठी वेब सिरीज स्त्रीलिंग पुलींग मध्ये सुद्धा तिची महत्त्वाची भूमिका होती. २०२० मध्ये तिचा तुझं माझं अरेंज मॅरेज हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

तान्हाजी ह्या सिनेमात शशांक शेंडे, अजिंक्य देव, जग्गनाथ निवांनगुने, त्रिशा पाटील,प्रसन्न केतकर, कैलाश वाघमारे, धैर्यशील घोलप, प्रमोद मोरे, देवेंद्र गायकवाड ह्यासारखे मराठमोळे चेहरे सुद्धा तुम्हाला दिसतील. ह्या सर्व कलाकारांपैकी सर्वात जास्त कौतुक होत आहे ते म्हणजे कैलाश वाघमारेचे. त्याने निभावलेली चुलतीया ही भूमिका प्रेक्षकांना खूप पसंद पडली आहे.

मित्रानो तुम्ही जर हा सिनेमा पाहिला असेल तर तुम्हाला हा सिनेमा कसा वाटला? कुणाचे अभिनय तुम्हाला जास्त आवडले ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.