तांदूळ धुतलेले पाणी आपल्या चेहऱ्याच्या स्किनसाठी आणि केसांसाठी अत्यंत उपयोगी असे टॉनिक आहे. त्यामुळे हे पाणी आपण रोज तांदूळ धुतल्यावर फेकून देत असतो. पण आज आम्ही जी पोस्ट केली आहे ती वाचल्यावर कदाचित तुम्ही हे पाणी फेकून न देता त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग कराल आणि टाकाऊ पासून टिकाऊ असणारे हे पाणी आपल्या उपयोगात आनाल. हे तांदळाचे पाणी उपयोग करण्याअगोदर पहिल्या पाण्यात धुवून काढावे आणि हे पाणी फेकून द्यावे कारण तांदळाला कीटक नाशक फवारलेले असतात.
दुसऱ्यांदा पुन्हा पाणी घेऊन ये थोडा वेळ भिजत ठेवा. पाण्याचा रंग पांढरट होईल इतके ठेवा त्यानंतर ते पाणी वापरात आणा आणि तांदूळ भात बनवण्यासाठी वापरा. रोज उन्हात फिरून आपल्या चेहरा कलवडलेला असतो. त्यावर आपण नेहमी केमिकल युक्त क्रीमचा उपयोग करत असतो. पण हे तुम्ही टाळायला हवे यासाठी तांदळाच्या पाण्याचा उपयोग करावा. हे पाणी घ्या आणि त्यात थोड कोरफडीचा गर मिसळा आणि चेहऱ्याला लावून मालिश करा, सुकल्यावर धुवून टाका,आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा उपाय करावा.
तांदूळ धुतलेले पाणी तिन्ही उपयोगात आणता पण जेव्हा काही लोक हे भात न बनवता फेकून देतात तर तसे करू नका. मिक्सर मध्ये बारीक करून घ्या. त्यात थोड खोबरेल तेल आणि दोन चमचे लिंबू रस मिसळा आणि हे स्क्रब चेहऱ्यावर लावा आणि मालिश करा.
तांदळाच्या पाण्यात अॅंटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. ज्यामुळे तुमची त्वचा रुक्ष आणि कोरडी पडली असेल तुमच्या त्वचेला मऊपणा हवा असे तर रोज चेहऱ्यावर तांदळाचे पाणी लावा. ज्यामुळे तुम्हाला तुमच्या त्वचेमध्ये फरक नक्की जाणवेल.
तुम्ही जेव्हा केस धुता आणि त्यानंतर या तांदळाच्या पाण्याचा उपयोग एखाद्या कंडिशनर सारखा करावा त्यामुळे तुमचे केस घनदाट आणि लांब होतील.
तुम्ही केसात कोंडा होणे या समस्येला त्रासले असाल तर यासाठी ज्या दिवशी केस धूनार आहात त्या दिवशी केस धुण्याच्या एक तास अगोदर तांदळाच्या पाण्यात दोन चमचे लिंबू रस मिसळा आणि एक तासाने केस धुवा.