सैराट हा सिनेमा सुपरहिट ठरला होता पण त्यातील प्रत्येक पात्राने आपले काम चोखपणे बजावले होते. त्यातीलच एक पात्र म्हणेज आपला प्रदीप म्हणजे त्याचे खरे नाव आहे तानाजी गालगुंडे हे आहे. हा त्याचा पहिला वाहिला चित्रपट होता. शिवाय या चित्रपटा अगोदर त्याने कोणताच अभिनयाचा अभ्यास केला नव्हता. त्याला अभिनयाचा कसलाच गंध नसताना या चित्रपटात त्याने महत्वाची आणि लोकांच्या मनाला भावणारी भूमिका अत्यंत उत्कृष्ट पणे पार पाडली आहे.

आपल्याला या भूमिकेनंतर हा तानाजी अभिनयाच्या बाबतीत किती तगडा आहे कळलेच पण हाच तानाजी खऱ्या आयुष्यात कसा आहे हे तुम्हाला सर्वांना नक्कीच माहीत नसेल. तानाजी याने या चित्रपटात एका लंगड्याची भूमिका केली होती. पण खर तर तो खऱ्या आयुष्यात ही अपंगच आहे. त्याला लहानपणापासून शेती करण्याची मनापासून आवड आहे. जरी तो एक अभिनेता झाला असला तरी आपल्यातील शेतीला विसरला नाही.
तानाजीचे चाहते त्याला भेटण्यासाठी त्याच्या घरी ही येतात आणि त्याच्यासोबत फोटो ही काढतात. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील बेंबळे या गावी तानाजी राहत आहे. सध्या तरी तो आपले शिक्षण पूर्ण करण्याच्या मार्गावर आहे. कॉलेज मध्ये बी ए च्या दुसऱ्या वर्षाला तो शिकत आहे. शेतीची आवड आहे पण पाण्याच्या कमतरतेमुळे शेती तशीच पडून आहे. त्याच्या उदरनिर्वाह साठी पंचायत समितीने त्याला झेरॉक्स मशीन ही दिले आहे.
सैराट नंतर तानाजीने काय केले ह्याची उस्तुक्ता सगळ्यांनाच असेल. त्याने सोनी चॅनेलवर ड्रामा कंपनी ह्या कॉमेडी शो मध्ये काम केलं. त्यांनतर मात्र तो कोणत्याच चित्रपटात किंवा मालिकेत दिसला नाही.