हिंदू धर्मामध्ये तीन धातूंना सर्वात जास्त महत्त्व आहे ते कोणते तर, सोने, चांदी आणि तांबे हे आहेत. आणि म्हणून पूजा किंवा अनेक प्रकारचे विधी करताना हे तीन धातू नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात. तसेच तांब्याचे भांडे वापरून आपण पाणी पिल्याणे आपल्या शरीराला अनेक घटक मिळतात. त्याच प्रमाणे अशा प्रकारच्या तांब्याच्या अलंकारांनी तुम्ही तुमचे शरीर ही निरोगी ठेऊ शकता. तांब्याची अंगठी किंवा कडा घातल्यामुळे तुमच्या शरीरात एकप्रकारची सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
कित्तेक लोक तांब्याची अंगठी किंवा कडे आपल्या हातात घालतात. पण काही लोकं त्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहतात पण खरं तर हे आभूषणे घालने तितकंच तुमच्या शरीराच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. तांब्याची अंगठी किंवा कडा घातल्याने तांब्यात असणारे अँटी बॅक्टेरिअल आणि अँटी मायक्रो बॅक्टेरिअल हे घटक आपल्या शरीराला मिळत असतात आणि यामुळे आपले अनेक आजारांपासून नक्कीच रक्षण होते. म्हणजेच तुमच्या शरीरात रोगप्रतिकार शक्ती वाढते.
तांब्याची अंगठी किंवा कडे आपण परिधान केल्यामुळे सतत त्याचा स्पर्श आपल्याला शरीराला होत असतो आणि त्यातील काही घटक असे असतात त्यामुळे तुमचे रक्त नेहमी शुद्ध राहते.
तांब्याची अंगठी किंवा कडे धारण केल्यामुळे आपल्या शरीरातील अधिक असणारी उष्णता कमी होते ताणतणाव कमी होते. शिवाय मानसिक दृष्ट्या आपण सक्षम होतो. आणि महत्वाचं म्हणजे तुमचं तुमच्या रागावर नियंत्रण राहते.
अंगठी किंवा कडे घातल्याने हिवाळ्यात होणारे दुखणे कमी होते, शिवाय सूज ही कमी होण्यास मदत होते.
त्याचबरोबर तुमच्या शरीरात तांब्याच्या कमतरतेमुळे रक्तामध्ये असंतुलित पना निर्माण होतो आणि त्यामुळे कॉलेस्ट्रॉल वाढते त्यामुळे उच्च रक्तदाब सारखा आजार तुम्हाला होऊ शकतो याकरिता तांब्याची अंगठी किंवा कडा घाला. आणि म्हणून उच्च रक्तदाब किंवा कमी रक्तदाब असणाऱ्या लोकांनी तांब्याची अंगठी किंवा कडे घालायलाच पाहिजे.
आता सर्वात महत्वाचे म्हणजे जी अंगठी किंवा कडे घालणार आहेत ते शुद्ध तांबे असायला हवे. तरच याचे फायदे तुम्हाला मिळतील.