संकेत घाईघाईत कुठे निघालास? भाकर तरी खाऊन जा पोरा? नाय आई नको, उशीर होतेय मी खाईन काही बाहेर. संकेत जडपावलाने रस्ता सोडत होता. डोक्यात अनेक प्रश्नांनी काहूर माजवले होते. कुठेच त्याला आशेचे किरण दिसत नव्हते. घरात आई आणि एक लहान बहीण. बाबा दोन वर्षापूर्वीच गेले. बाबा गमावल्यापासून घराची सर्व जबाबदारी संकेतवरच आली होती. पण त्याला ती पेलता येत नव्हती. असे नाही की त्यांनी काही प्रयत्न नाही केले पण बाबा गेल्यापासून शिक्षण अपूर्ण राहिले. नोकरी साठी जिथे जिथे प्रयत्न केला तिथे नेहमीच हातात निराशा पडली.
आई लोकांच्या घरची धूनी भांडी करत होती म्हणून कसे तरी घर चाललं होतं. त्यात संकेतचे शिक्षण तर सुटलेच होत म्हणून बहिणीने तरी शिक्षण घ्यावे अशी त्याची इच्छा होती. आईला न सांगता आज घर सोडून तो निघून आला होता तो परत घरी तेव्हाच जाणार होता जेव्हा स्वतः काही साध्य करून दाखवेल. शहरात येऊन त्याने अनेक ठिकाणी कामासाठी प्रयत्न केले पण काही केल्या काम मिळत नव्हते. खायची आणि राहायची अशा दोन्ही समस्या त्याला भेडसावत होत्या.
रोज रात्री फूटफाटवर झोपून दिवस ढकलत होता. रोज एक वडापाव आणि पाणी बस ह्यापेक्षा अधिक त्याच्या काहीच पोटात जात नव्हते. आज मात्र त्याला स्वतःचा खूप राग आला होता. आयुष्यात आपण काहीच कमावले नाही. स्वतःच्या आई आणि बहिणीचे सुद्धा आपण पालन पोषण करू शकत नाही ह्याहून दुर्दैव काय असावे. बस झाले आता संपवावे स्वतःला अशा जगण्याला काहीच अर्थ नाही. ह्या विचाराने तो रेल्वे पुलावर गेला. स्वतःला झोकून देणार इतक्यात मागून त्याचा हाथ साठीतल्या एका इसमाने पकडला.
वेडा झालास का रे तू? आयुष्य एकदाच मिळतं, असे संपवणार आहेस का आयुष्य? काय करू बाबा, काहीच नाही राहिले आयुष्यात. एक जॉब मिळत नाहीये, घरी पैसे पाठवू शकत नाहीये. मग असे आयुष्य काय कामाचे? अरे पोरा आयुष्यात नेहमीच चढ उतार येत असतात. जो ह्या परिस्थितीतून वर गेला तोच यशस्वी झाला. सर्वच अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने मिळाले असते तर हे जीवन व्यर्थ होते. जगण्यात काहीच अर्थ लाभला नसता. एक काम कर इकडून समोर गेला ना की डाव्या बाजूला स्वामींचे मठ आहे. तिथे जाऊन त्यांना भेट त्यांच्याकडे राहायची आणि कामाची व्यवस्था आहे.
मी तिथला ट्रस्टी आहे. बाकी मी पाहून घेईल चल निघ पाहू लवकर इथून. आता परत मनात असा कधीच विचार आणू नकोस आणि विचार आलाच तर शांतपणे डोळे बंद कर आणि तुझ्या आई आणि बहिणीचा चेहरा समोर आन, जर तू असे काही केलेस तर ते कुणाच्या भरवशावर आयुष्य काढतील. त्या वयोवृध्द बाबांनी संमजवल्यावर संकेतच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळाली होती. त्याने मठात जाऊन तिथले काम स्वीकारले. तिथे काम करण्यासाठी त्याला चांगले पैसे, जेवण आणि राहणे मिळत होते.
स्वामींच्या मठात काम करत असताना असे वाटतं होते जणू स्वतःच्या घरात आहे. स्वर्गाहून सुंदर ही जागा नेहमीच एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा देते. स्वामींचे ते तेज, रोज होणारा श्री स्वामी समर्थांचां गजर ह्यात काही महिने कसे गेले कळले सुद्धा नाही. एक दिवस संकेत ने तलाठी पदासाठी अर्ज केला आणि त्याचे नशीब उघडले. त्याने लेखी आणि मुलाखती मध्ये चांगली कामगिरी करत तलाठी परीक्षा पास केली. खूप खुश होता तो. अखेर त्याच्या प्रयत्नांना कुठेतरी यश आले होते.
स्वामींचे मुखी नाव असेल तर आपण काहीही करू शकतो. हे त्याने आज अनुभवले होते. त्याला कुणीतरी सांगितले की आपले ट्रस्टी सुद्धा आज आलेत मठात. त्यांच्यामुळे खरंतर हे शक्य झाले होते. नाहीतर आज माझा जीव मी गमावून बसलो असतो. तो लगबगीने त्यांना भेटायला गेला. पुजारिना विचारले ट्रस्टी कुठे आहेत? ह्या काय मॅडम उभ्या आहेत, ह्याच आपल्या ट्रस्टी आहेत. नाही कसे शक्य आहे मला तर स्टेशनवर ते आजोबा भेटले होते ते ट्रस्टी होते. असा विचार तो करत असताना त्याला स्वामींच्या महतीचे परत एकदा जाणीव झाली.
म्हणजे ते स्वामी होते ज्यांनी माझा जीव वाचवला आणि आज मला स्वतःच्या पायावर उभे केले. मनात एकच गोष्ट सध्या फिरत आहे ती म्हणजे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.
मित्रानो आपण सर्वच स्वामींचे भक्त आहोत पण कधी कधी असे काही गोष्टी घडत असतात ज्याचा आपल्या डोळ्यावर जरी पाहून विश्वास बसत नसेल तरी त्या आपल्याला मान्य कराव्या लागतातच. तुम्हाला सुद्धा स्वामींचा असा काही अनुभव आला आहे का? आम्हाला नक्की कळवा.
ही स्वामी कथा सुद्धा वाचा
पाटीलजी