सुपारी ही पानात वापरली जाते हे आपल्याला माहीत आहेच. शिवाय काही लोक नुसती ही चघळतात. वयस्कर लोकांना ही चघळण्याची सर्वात जास्त सवय असते. आता सुपारीचे झाड हे नारळाच्या झाडा सारखेच दिसते. सुपारी ही अनेक हिंदू धर्मातील पूजा मध्ये वापरली जाते. काही लोक सुपारी ही आपल्या शरीरासाठी घातक आहे असे मानतात तर काही ना सुपारी मध्ये अनेक गुण आढळतात. म्हणजेच आयुर्वेदामध्ये सुपारी खूप घटकांनी परिपूर्ण आहे ते आज आपण पाहूया, सुपारीमध्ये कार्बोहायड्रेट, फॅट तसेच टॅनिन, गॅलिक अॅसिड आणि लिगनीन हे घटकही आढळतात.
सुपारीमध्ये अँटीऑक्सीडेंट असतात, जे शरीरातील विषारी पदार्थ आणि फ्री रॅडिकल्स बाहेर काढण्यास मदत करतात. सुपारीच्या भाजून बारीक चुरा करून त्याने दात घासावे त्यामुळे तुमचे दात दुखत असतील तर ते दुखणे बंद होते. ३ सुपाऱ्या भाजून त्यांचे बारीक चूर्ण तयार करावे. या चुर्णामध्ये ५ थेंब लिंबाचा रस आणि एक ग्रॅम काळे मीठ मिसळावे. दररोज दिवसातून दोन वेळेस या मिश्रणाने दात घासल्यास दात मजबूत होतात.
सुपारी चूर्ण तसेच हळद यांच्यामध्ये थोडी साखर यांचे मिश्रण घेतल्याने तुमची उलटी थांबण्यास मदत होते.
एक्जिमा साठी सुपारी जाळून त्याचे भस्म तयार त्यात थोड तिळाचं तेल आणि तूप मिसळून हा लेप झालेल्या ठिकाणी लावा.
सुपारी चघळत राहिल्यास तणाव दूर होतो, असे एका संशोधनात आढळून आले आहे.
त्वचा रोगांसाठी सुपारी दगडावर उगळा आणि ही पेस्ट कोणत्याही भागावर लावा ज्या ठिकाणी तुम्हाला त्वचारोग झाला असेल आराम मिळेल.
मधुमेह झालेल्या व्यक्तींना तोंड आतून सुकण्याची जास्त समस्या असते अशा वेळी तोंडात सुपारीच्या तुकडा चाघळावा.
सुपारी मध्ये असणारे टॅनिन असिड यामुळे तुमचा उच्च रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते.