सुनील शेट्टी याचा मुलगा आहान शेट्टी याने ही आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेऊन बॉलिवुड फिल्म इंडस्ट्री मध्ये आपले पहिले पाऊल ठेवले आहे. तो सिनेमा आहे RX 100 तेलगू सिनेमाचा रिमेक असणार आहे आणि हा चित्रपट साजिद नाडीयावाला निर्मित करत आहेत. लूथारिया हे ह्या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहेत. तरी बॉलिवुड मध्ये स्टार किड्सची जास्त रेलचेल आपल्याला दिसत आहे. सुनील शेट्टीचा मुलगा आपल्या नवीन प्रवासाला सुरुवात करत आहे. त्याचा हा प्रवास त्याच्या वडिलांनी प्रमाणे त्याला ही उंच शिखरावर नेऊन ठेवाे.
आहान शेट्टी आपल्या लव्ह लाईफ मुले अगोदरच प्रेक्षकांच्या प्रकाश झोतात आहे. त्याचे तानिया श्रॉफ आणि आहान शेट्टी यांचे प्रेम प्रकरण जुळले आहे. याअगोदर 2015 साली सुनील शेट्टी यांची मुलगी आथिया शेट्टी हिने हिरो सिनेमात आपले पाहिले पाऊल ठेवले होते पण तिचा हा चित्रपट फ्लॉप झाला होता. इतर स्टारकिड्स प्रमाणे सुनील शेट्टीचा मुलगा आहान शेट्टी बॉलीवूडमध्ये आपले पाहिले पाउल टाकण्यास सज्ज आहे. तो साजिद नाडीयाडवाला यांच्या दिग्दर्शनाखाली एक फिल्म करणार आहे.
सुनील शेट्टी आपल्या मुलाच्या बाबतीत बोलताना सांगतात की, मला माझ्या मुलाच्या अभिनयाबाबतीत अजिबात तक्रार नाही तो माझ्यापेक्षा खूप चांगला अभिनय करतो आहे. लोकांनी त्याला पसंद केले तर त्याच्या मेहनतीचे चीज होईल. त्याचा अभिनय लोकांना आवडला तर त्यासाठी देवाचा आशीर्वाद त्याच्या पाठी आहे असे मी समजेन. पण जर तो या सिनेमात लोकांना नाही आवडला तर मात्र तो इतर स्टार किड्स सारखे स्ट्रगल करत राहणार हे खरे. हा चित्रपट साजिद नाडीयावाला करणार आहेत म्हणजे काय चिंता करण्याची गोष्ट नाही. त्यांनी बनवलेले सगळेच सिनेमे लोकांना आवडलेले आहे.
RX 1000 हा सिनेमा तेलगू इंडस्ट्री मध्ये गाजलेला सिनेमा आहे. प्रत्येक वेळी मुलेच वाईट नसतात, समाजाचा दृष्टिकोन ह्याबाबतीत बदलायला हवा. ह्या सिनेमात ह्याचे उत्तम उदाहरण दाखवले आहे.त्यामुळे ह्या सिनेमाचे कथानक खूप छान आहे. सिनेमाच्या शेवटी जो सस्पेन्स खुलतो त्यामुळे प्रेक्षकांना एक प्रकारचा धक्काच बसतो. आणि आता हाच सिनेमा हिंदी भाषेत येतोय म्हटल्यावर उत्सुकता नक्कीच अजुन असणार.