मित्रानो तुम्ही आम्ही केळी हे फळ खूप आवडीने खातो आणि सगळ्यांनाच परवडणारा हे फळ आहे. महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात रावेर, चोपडा व यावल ही तालुके केळी उत्पादनात अग्रेसर आहेत. तसेच केळी ही आपल्या शरीराच्या दृष्टीने किती फायदेशीर आहेत हे ही आपल्याला माहीतच आहे. केल्याचा उपयोग खाण्यासाठी तर होतोच पण अजूनही त्याचे उपयोग आहेत. केळी पासून केळीचे वेफर्स, केळीचा जॅम, केळीची भुकटी, केळीचे पीठ, केळीची प्युरी, केळीचे पेठे, केळीची दारू, ब्रॅन्डी, शिरका, केळी बिस्कीट असे कितीतरी पदार्थ बनवले जातात.

पण आज आपण पाहणार आहोत केळीपासून बनवली जाणारी सुकेळी कशी बनवतात आणि कुठे मिळतात. ज्या केळ्याच्या जातीपासून ही बनतात त्याला राजेळी जातीची केळी असे म्हणता त ही केळी पूर्णपणे नैसर्गिकरित्या पिकवून, सुकवून, फळातला मुळातला गोड टिकवून सुकेळी तयार करण्याची प्रक्रिया तशी किचकट आणि कौशल्याची तर आहेच वसई परिसरात दिवाळीनंतरच्या चार- पाच महिन्यात मिळतात ही सुकेळी. तसेच या सुकेळ्याच व्यवसाय उत्तम प्रकारे झाल्यास हे फळ फळांच्या राजाच्या तोडीस तोड ठरू शकेल. त्याचप्रमाणे ही सुकेळी खानाऱ्यांचा असा खास वर्ग आहे ती लोक अशी केली नेहमीच मागवत असतात.
त्यानंतर ही केली पारंपरिक आणि प्राकृतिक पद्धतीने घराच्या छतावत आणि कारवीच्या मांडवावर जवळ जवळ सहा ते सात दिवस सुकवली जातात. संध्याकाळ व्हायच्या आता ही केली टोपलीत काढली जातात नाहीतर दवाणे ही केली ओली पडण्याची शक्यता असते. वसई तालुक्यात ही सुकेळी मिळतात. मुंबईत काही ठराविक फळविक्रेते आणि अगदी मोजकी ठराविक मराठमोळ्या खाद्यपदार्थांची दुकाने इथे ही केळी मिळतात. तसेच फ्रीजबाहेर ठेवल्यास ही सुकेळी साधारण महिने ते दोन राहतात. फ्रीजमध्ये सहा महिन्यांपर्यंत त्यांची चव आणि रंग चांगला राहतो.
हे पण आर्टिकल वाचा
- विड्याचे पान खाणे चांगले की वाईट चला पाहूया
- आपण सर्व साबुदाणा तर खातो पण त्याचे गुणधर्म आणि मिळणारे फायदे माहितीच नसतात. वाचा मग तुम्हालाही समजेल किती गुणकारी आहेत साबुदाणा सेवन