“कभी हा कभी ना” या चित्रपटात काम करणारी सुचिता कृष्णमुर्ती ही अभिनेत्री तुम्हाला कदाचित आता तिची आठवण ही नसेल पण ह्या चित्रपटाला जवळ जवळ 26 वर्ष पूर्ण झाली आहेत आता आणि याच दरम्यान शाहरुख सोबत या चित्रपटात काम करत असणारी ही अभिनेत्री जेव्हा शाहरुखला भेटते तेव्हा ते दोघे एकत्र सेल्फी काढतात आणि हाच त्या दोघांचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
1994 साली हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन कुंदन शाहने यांनी केले होते. तर चित्रपटाची निर्मिती विक्रम मेहरोत्रा यांनी केली होती.या अभिनेत्रीला पाहून आता कदाचित तुम्ही तिला ओळखणार ही नाही की ही तीच अभिनेत्री तेव्हा तिने शाहरुख सोबत काम केले होते. पण उतार वय सर्वांच्याच नशिबात येणारा एक भाग आहे. हा फोटो सोशल मीडियावर शेअर करताना तिने तिच्या मनातील भावांना ही व्यक्त केल्या आहेत.
या चित्रपटाला जवळ जवळ 26 वर्ष पूर्ण झाल्याने तिने ट्विटरवर ट्विट केला आहे की तिने तिच्या आयुष्यात खूप कमी चित्रपट केले आहेत पण हा जो चित्रपट आहे कभी हा कभी ना या चित्रपट मध्ये काम केल्याचा आनंद मला आज ही आहे. मी नशीबवान आहे की मी या चित्रपटचां एक भाग होते. सुचित्रा कृष्णमुर्ती हिने या दोघांच्या सेल्फी सोबत आणखी एक फोटो शेअर केला आहे तो म्हणजे तिच्या मुलीचा म्हणजे कावेरीचा फोटो आहे.
मित्रानो असे कितीतरी अभिनेते आणि अभिनेत्री या फिल्म इंडस्ट्री मधून सध्या तरी गायब झाल्यासारखे आहेत पण कधी कधी अचानक आपल्या समोर आलेल्या या कलाकारांना पाहून आपले ही मन त्या वेळी त्या चित्रपटाच्या आठवणीत रंगून जाते.