जेव्हा कोणाच्याही अंगी काही करण्याची धमक असते तेव्हा ती व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत ते पूर्ण करू शकते. तेव्हा मात्र त्याच्याजवळ कोणत्याही प्रकारचा बहाणा नसतो की माझ्याजवळ हे नाही आणि ते नाही. त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अजिबात ठीक नव्हती. तरीही त्याचे आई बाप त्यांचे हे जीवन बदलण्याचा अाटोकाट प्रयत्न करत होते. आर्यन याने आपल्या पूर्ण प्रयत्नांनी फक्त 19 व्या वर्षाचा असतांनाच आपल्या वडिलांचे जीवनच बदलून टाकले.

आर्यन जेव्हा छोटा होता तेव्हा त्याला चांदण्या आणि चंद्र या गोष्टीमध्ये रस होता. अंतरीक्षच्या दुनियेत घुसू पाहत होता. यातच त्याचे वडील हे वॉचंमेन तर होतेच शिवाय ते गल्लीबोळ मध्ये जाऊन पेपर पोचवत असत. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खूपच हलाखीची होती. त्यांनी कसतरी करून आर्यनला वस्ती मधल्या प्रायव्हेट शाळेत टाकले. आणि इथूनच त्याच्या स्वप्नांना पंख फुटू लागले.
10 वर्षाचा असतांनाच आर्यनच्या मनात अंतरालय आणि या दुनियेला जाणून घेण्याची इच्छा झाली. यात त्याने शाळेत एस्ट्रोनॉमी वर्कशॉप’ मध्ये एडमिशन घेतले यात त्याने पहिल्यांदा टेलीस्कोप ने शनि ग्रह चे सुंदर रिंग्ज बघितले आणि यातूनच त्याने आपली पाऊले पुढे टाकण्यास सुरुवात केली. पण जेव्हा त्याच्या आई वडिलांना आर्यन च्या या स्वप्नां बद्दल समजले तेव्हा त्यांना धक्का बसला कारण पुढे करीय रच्या दृष्टीने हे त्याच्या हिताचे नाही असेच त्यांना वाटू लागले होतें.

त्यानंतर आर्यन ने पैसे वाचावयला सुरुवात केली त्याने कितीतरी कामे करायला सुरुवात केली यातून त्याला 5000 रुपये मिळाले. या पैशातून आर्यन ने टेलीस्कोप विकत घेतला पण त्याच्या घरातल्यांना हे अजिबात आवडले नव्हते त्यांनी त्याच्याही जवळजवळ 4 दिवस बोलणं बंद केलं. पण आर्यनचे याकडे लक्ष नव्हते त्याचे लक्ष फक्त दिवस रात्र वरती ढगात बघण्यात जात होता. शेवटी त्याची मेहनत सफल झाली आणि त्याने 14 व्यां वर्षी Asteroid शोधून काढले.
ही बातमी न्यूजपेपर मध्येही छापून आली हे ऐकुन त्याच्या आई वडिलांनाही आश्चर्यच वाटलं कारण यागोदर त्यांच्या वस्तीमधील कोणाचीही अशी न्युज छापून आली नव्हती. आता मात्र आर्यनला विश्वविद्यालय मध्ये लेक्चर देण्यासाठी आमंत्रण येऊ लागले यातच त्याने पहिल्या महिन्यात 30 हजार रुपये कमावले. त्यावेळी ती पैसे कमवायचा सोबत आपले शिक्षण ही पूर्ण करत होता.
आता आर्यन 19 वर्षाचा आहे. तो आता आर्थिक परिस्तिथी ने इतका मजबूत झाला आहे की, त्याने आताच आपल्या आईवडिलांना विमानामधे बसवले त्याचबरोबर आपल्याच पैशाने त्याने आपल्या आईवडिलांना महागड्या हॉटेल मध्ये जेवण दिले. आर्यन अशा लोकांसाठी एक प्रेरणा आहे ज्यांना वाटते की आपल्यासाठी सगळे दरवाजे बंद झालेत परंतु आर्यन ने हे सिद्ध केले आहे की, आपली स्वप्ने कितीही मोठी असो पण त्यांना आपण स्वतः पूर्ण करता आले पाहिजे.