आज घरी पहिल्यांदा आमच्या ह्यांचे मित्र येणार होते तसे ते ह्या अगोदर पहिले आले असतील पण आमचे लग्न झाल्यापासून ते पहिल्यांदाच आमच्या घरी येणार होते. दोघांची मैत्री अगदी घट्ट होती एकमेकांच्या मनातील सर्व सांगत होते पण आमचं जेव्हा लग्न झालं तेव्हा त्यांच्या मित्र कामा निमित्ताने बाहेर गावी गेला गेला होता. म्हणजे तिथेच वर्षभर होता. यांनी आमच्या लग्नाचे फोटोही पाठवले नाही त्याला म्हणाले फोटो वगैरे काही मिळणार नाही तू जेव्हा घरी येशील तेव्हाच माझ्या बायकोला पाहशील. सुंदर, नाकेडोली देखणी, उंच कमनीय बांधा लांब केस, गोऱ्या रंगाची तुझी वहिनी पहायची असेल तर लवकर घरी ये आणि पहा माझी बायको कशी दिसते ते.
घरात आज तशी भरपूर तयारी चालू होती काही तयारी झाली होती म्हणजे त्यांच्या मित्राला काय काय आवडते ते आमच्या यांनी अगदी लगबगीने आणून ठेवले होते, शेजारच्या आणि जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना दहा दहा वेळा सांगून झाले असेल सतीश येणार आहे माझा यार.. खूप दिवसांनी भेटणार आम्ही दोघं हे त्यांचे बोल आज मी खूप वेळा त्यांच्या तोंडातून ऐकले आहे. त्याच्यावरून त्यांच्या मनातील मित्राची जागा मला कळून चुकली होती.
इतकेच नाही तर मित्राच्या आवडत्या रंगाचा शर्ट आणि पँट ही त्यांनी घेतला होता त्याला द्यायला त्याला आवडणारी जिलेबी दोन किलो आणून ठेवली होती आणि मला अगोदरच सांगून ठेवले होते आज मस्त साडी घाल हा, माझ्या मित्राला तुला पाहून धक्का बसला पाहिजे. मी म्हटलं ही चालेल की म्हणून मी सुध्दा मस्त शेवाळी रंगाची बारीक काठाची साडी नेसली, केसांची वेणी घातली, त्यावर त्यांनी आणलेले मस्त गजरे सोडले, डोळ्यात काजळ भरले, कपाळावर मस्त मोठी टिकली लावली, ओठांवर गुलाबी रंगाची लिपस्टिक खूप शोभून दिसत होती.
तिच्या गोऱ्या रंगावर काहीही उठून दिसायचे पण त्याचबरोबर तिच्या चेहऱ्यावर रेखिवपणा होता. डोळे कसे मृग नयनी, खूप म्हणजे खूप नशीबवान होता जितू त्याला अशी अप्सरा सारखी बायको मिळाली. कारण जितू मुळात दिसायला सावळा, शिवाय त्याची शरीरयष्टी ही बेढबच होती. पण मनाने त्याच्यासारखा निर्मल आणि वाहत्या झऱ्यातील पाण्यासारखा ज्याला कसलीच अपेक्षा नाही असा जितू.
त्याच्यासोबत हिने लग्न तरी कसे काय केले हाच प्रश्न अख्ख्या गावाला पडला होता. गावातील तरुण मुले तर जितूवर जलायची कारण इतक्या काळयाला अशी सुंदर बायको मिळणे म्हणजे त्या तरुण मुलांना आपला अपमान वाटायचा. ते कधी कधी जितूला टोमणे ही मारायचे पण जितूचा मुळात स्वभाव भोळा तो कधीच कोणाच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं नाही. नेहमी दुसऱ्याच चांगलं कसं होईल याच्याकडे त्याचे जास्त लक्ष असायचे. दुसऱ्याचे वाईट पाहणे हे जणू त्याला माहीतच नव्हते.
वेळ ठेपली जितू आपल्या मित्राला आणायला स्टँडवर गेला. सतीशची कार येताना पाहून जितूने त्याला लांबूनच हात केला. जितूला पाहून सतीशने गाडी थांबवली गाडीतून उतरला दोघांनी एकमेकाला घट्ट मिठी मारली, कसा आहेस सगळी विचारपूस चालू झाली इतक्यात जितू म्हणाला सगळं इथच विचारणार आहेस का घरी पण येणार आहेस.. “हो हो म्हणजे काय घरी तर येणारच आमच्या वहिनींना पहायचं आहे” असे बोलून दोघेही कार मध्ये बसले, बसल्यावर ही दोघांचे आपापसात बोलणे चालूच होते.
घरा बाहेरच नळावर सतीशने हात पाय धुतले आणि खिशातील रुमाल काढून तोंड पुसत घरात निघाला. सोबत जितू होताच खुर्चीत बसले इतक्यात सतीश म्हणाला जितू यार वहिनी आहेत तरी कुठे? आता तरी बाहेर बोलावं की त्यांना जितू बायकोला हाक मारतो हातात चहाचा ट्रे घेऊन ती बाहेर येते “ये प्रिया, ही बघ जितू माझी बायको आहे की नाही जणू अप्सरा” जितू ने नजर वर करून पाहिले आणि त्याला धक्काच बसला.
कथेचा दुसरा भाग इथे क्लिक करून वाचा