साऊथ सिनेमातील अभिनेते संपूर्ण जगात आपल्या अभिनयाने ने फेमस आहेत. आज आम्ही ज्या हिरोंबद्दल सांगणार आहोत ते साऊथ मधील पाच सुपरस्टार असे हिरो आहेत. ज्यांनी लहान असताना चाइल्ड आर्टिस्ट म्हणून करिअर मध्ये सुरुवात केली होती. तर जाणून घेऊ या असे कोणते सिनेमे आहेत ज्या सिनेमात त्यांनी पहिल्यांदा पदार्पण केले होते.
जूनियर एनटीआर
जूनियर एनटीआर हा साऊथ मधील सर्वात सुपरहिट अभिनेता आहे. याची सुरुवात चाइल्ड आर्टिस्टच्या रुपात झाली होती. त्याला सगळ्यात मोठ यश 1996 मध्ये आलेला सिनेमा रामायण मिळाला होता आणि या भूमिकेसाठी एनटीआरला नेशनल अवार्ड सुद्धा प्राप्त झाला.

अली बाशा
साऊथ मध्ये 1000 पेक्षा ही जास्त सिनेमात काम करणारा अली बाशा याने चाइल्ड आर्टिस्टच्या रुपात सिनेमात आपल्या करीयर ची सुरुवात केली होती. त्याने 1981 आलेला सिनेमा सीठकोका चिलाका यात अली बाशा पहिल्यांदा सिनेमात दिसला होता. या सिनेमातील भूमिकेसाठी त्याला बेस्ट चाइल्ड एक्टर अवॉर्ड मिळाला आहे.

कमल हासन
साऊथ मधला सुपर हिट ठरलेला हिरो कमल हसन याने 1959 मध्ये कलाथुर कन्नम्मा या सिनेमा मध्ये चाइल्ड आर्टिस्ट म्हणून पदार्पण केले होते. 4 वर्षाचा असताना त्याने या सिनेमात पदार्पण केले होते आणि म्हणून त्यासाठी तेव्हा त्याला प्रेस्टीज प्रेसिडेंट गोल्ड मेडल मिळालं होते.

विजय
जोसेफ़ विजय चंद्रशेखर हा साऊथ मधील सगळ्यात लोकप्रिय अभिनेता आहे. विजय याने 1984 मध्ये आलेला सिनेमा वेत्री यात चाइल्ड आर्टिस्ट म्हणून काम केले होते त्यानंतर त्याने पुढेही कितीतरी सिनेमात चाइल्ड आर्टिस्ट म्हणून काम केले आहे.

महेश बाबू
महेश बाबू हा वर्तमान काळातील साऊथ मधील सगळ्यात मोठा सुपरस्टार अभिनेता आहे. याने आपल्या लहान वयापासूनच सिनेमात पदार्पण केले होते. आपल्याच वडिलांच्या सिनेमात त्याने चाइल्ड आर्टिस्ट म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली 1988 मध्ये मुग्गुरु कोदुकुलु या सिनेमातून तो खूप फेमस झाला होता.

मित्रानो तुम्हाला ह्या पाच सुप्रसिद्ध अभिनेता पैकी कोणता अभिनेता जास्त आवडतो हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.