उत्कृष्ट अभिनय आणि सुंदरता या दोन्ही गोष्टींनी या अभिनेत्री ने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. नटरंग या चित्रपटातून प्रेक्षकांना या अभिनेत्रीला अधिक उंच सिखरावर नेऊन ठेवले आहे. या चित्रपटात ही अप्सरा पाहिल्यावर आपल्याला धर्तीवर जणू स्वर्गातून अप्सरा आल्याचा भास झाला असे हिचे सौदर्य आहे. या सिनेमा अगोदर तिने बकुळा नामदेव घोटाळे या सिनेमात काम केले होते पण तेव्हा ती इतकी प्रेक्षकांना आवडली नाही जितकी नटरंग या चित्रपटातून ती लोकांना आवडली. तिने मराठीत तर काम केले आहेच पण त्याचबरोबर तिने हिंदी चित्रपटात ही काम केले आहे. ग्रैंड मस्ती आणि सिंघम रिटर्न्स या दोन्ही हिंदी सिनेमात तिने काम केले आहे.
प्रसाद ओक दिग्दर्शित आणि चिन्मय मांडलेकर लिहलेले ‘हिरकणी’ या चित्रपटात ही सोनाली हिने हिरकणी हीची भूमिका उत्तम पने साकारलेली दिसते. नुकताच ‘धुरळा’ या मराठी चित्रपटा रिलिज झाला आणि सोनाली त्यातून एका जबरदस्त भूमिकेत दिसली. अभिनय क्षेत्रापुरता मर्यादित विचार न करता ती सामाजिक आणि राजकिय विषयांवरही आपली मतं परखडपणे मांडते. शिवाय सोशल मीडियावरुन सामाजिक विषयांवर भाष्य करत लोकांना जागृत करण्याचं काम करते.
ती तब्बल 12 वर्ष झाली या चित्रपट सृष्टी मध्ये काम करत आहे. आणि आता तिने आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. कुणाल बेनोडेकर असे त्या व्यक्तीचे नाव आहे. व्यक्तीला सध्या ती डेट करत आहे. तिने आपल्या या जोडीदाराचे फोटो आपल्यासोबत इंस्टाग्राम वर शेअर केले आहेत. आणि बॉयफ्रेंड ला टॅग करून माय पार्टनर असे लिहले आहे माझ्या या जोडी दरासोबता मी जीवनाचे चढ उतार कर सज्ज आहे हे ही ती लिहायला विसरली नाही .आता याचा अर्थ आजच्या पिढीला समजाबायची गरज नाही.

ही प्रेम युगुल सध्या तरी दुबई मध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत आणि याशिवाय हा महिना म्हणजे 14 फेब्रुवारी प्रेमाचा दिवस हे ही अवचित्या असेल आता तुम्हाला प्रश्न पडला असेल मुळात हा कुणाल कोण आहे? तर कुणाल हा मूळचा लंडनचा आहे. चार्टर्ड अकाऊंटट आहे तसेच लग्नानंतर सोनाली ही सुद्धा दुबई मध्ये राहायला जाणार आहे अशी वार्ता आहे.