मित्रांनो कष्ट करा आणि इतके करा की त्याचे फळ हे तुम्हाला देव देणारच, कारण कोणत्याही कामात मेहनत केल्याशिवाय हातात काहीच मिळत नाही हे तुम्हाला ही माहीत आहे. अशीच कहाणी आहे ती म्हणजे स्नेहल शिदम ही अभिनेत्रीची तिचा अभिनय पाहता लोक तिच्या प्रेमात पडली आहेत. “चला हवा येऊ द्या ” या शो मधील तिने आपल्या करीयरला सुरुवात जरी केली असली तरी यापुढील तिचे भविष्य उज्वल आहे हे दिसून येते.
स्नेहल कदम हिच्या करीयरची सुरुवात जरी चला हवा येऊ द्या या शो मधून झाली असली तरी आता ती मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे, म्हणजे एक सिनेमा आला आहे ‘स्वीटी सातारकर’ या मधे ती आपल्याला पाहायला मिळणार आहे. तिने आपल्या या चित्रपटाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
स्नेहल ही चला हवा येऊ द्या या शो मध्ये झालेल्या होऊ द्या व्हायरल पर्वाची विजेती आहे. तिचा ओवी हा नी नाटक पाहायला मिळाला आहे अर्थातच तिचा अभिनय हा उत्कृष्ट असतो आणि आपल्याला या चित्रपटामध्ये ती पाहायला मिळेल. ‘स्वीटी सातारकर’ या चित्रपटात अमृता देशमुख, संग्राम समेळ, विजय निकम, गौरी जाधव, वंदना वाकनीस, पुष्कर पुष्कर लोणारकर, विनम्र भाबल, प्रशांत विचारे इत्यादी कलाकार आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तसेच या चित्रपटातील गाणी ही दमदार आहेत. शब्बीर नाईक यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तर मुनाफ नाईक, संतोष साबळे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.
स्नेहल बद्दल सांगायचे झाले यार चला हवा येऊ द्या शो मध्ये भाऊ कदम, कुशल बद्रिके, निलेश साबळे, श्रेया बुगडे, सागर कारंडे यासारख्या मातब्बर कलाकारांमध्ये आपले एक वेगळं नाव निर्माण करणे सर्वानाच जमत नाही. स्किट चालू असताना जेव्हा तिची एन्ट्री होते तेव्हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळी स्माईल असते. हीच तिच्या कामाची पोचपावती आहे.