मित्रांनो या जगात कोणत्या गोष्टी घडतील हे आपण सांगू शकत नाही आणि खर तर ही अगदी उत्तम गोष्ट आहे की एका टाकाऊ पदार्थ पासून एक उपयोगी वस्तूची निर्मिती करण्यात आली आहे. गोमय चरण पादुका असे ह्या निर्मित केलेल्या चपलाना नाव दिलं आहे. तस बघायला गेलो तर शेणाचे उपयोग भरपूर आहेत. पण या शेणापासून चपलांची निर्मिती करणे ही गोष्ट विश्वास बसण्या सारखी मुळातच नाही आहे. तर चला बघुया नक्की हे काय प्रकरण आहे.
जसे प्रत्येक गोष्ट तसेच वस्तू बनवल्या मागे एखाद्या व्यक्तीचा हात असतो. असाच हात या चपला बनवण्या मागे आहे, त्यांचे नाव आहे अमोल जाधव. पण महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या चपला जास्त हेवी नाही आहेत. त्यामुळे त्यांचा उपयोग तुम्ही फक्त घरात किंवा ऑफिसमध्ये करू शकता.
या चप्पल निर्मिती मागे या व्यक्तीने आपले मत मांडले आहे. त्यांचे म्हणणे ही अगदी १०० टक्के खरे आहे ते म्हणतात की, सध्याचा काळ हा बघायला गेलो तर सिमेंट काँक्रिटचा आहे. आपले पाय सतत लादी वर असतात त्यामुळे आपल्या शरीराला अनेक आजाराला सामोरे जावे लागते. त्यासाठी ह्या चपला वापरून तुम्ही तुमचे आजार आटोक्यात आणु शकता. ज्यांना रक्तदाब आहे किंवा मानसिक संतुलन बिघडले आहे, गुडघे दुखी किंवा सांधे दुखणे यावर ही चप्पल तुम्ही वापरू शकता.

तस बघायला गेलात तर ही चप्पल तुम्हाला वाटत आहे तितकी हलकी नाही आहे. मजबूत चप्पल आहे ही. पाण्यात भिजली किंवा हाताने खरवडली तरी तिला काहीच खराबी येत नाही. ज्यांचे काम दिवसभर खुर्चीत बसून असते किंवा उभ्याने असते अशांसाठी ही चप्पल उत्तम आहे. आयटी कंपनीकडून या चपला ना भरपूर मागणी आली आहे. चांगल्या ब्रँडच्या किंवा खास करून विदेशी ब्रँडच्या चपला आपण नेहमीच घालत आलो आहोत.
पण आता बदल घडवून आणायची जबाबदारी आपली आहे. जास्तीच जास्त भारतीय ब्रँड कडे आपल्या भारतीयांनी गेले पाहिजे. ह्यासाठी सुरुवात आपण स्वतः पासून केली पाहिजे. हे पण वाचा पावसाळ्यात घरात फिरणाऱ्या माशांचा त्रास होत असेल तर करा हे उपाय