Home करमणूक मराठी रिव्ह्यू: सीता रामम (Sita Ramam)

मराठी रिव्ह्यू: सीता रामम (Sita Ramam)

by Patiljee
3697 views
Sita Ramam

सीता रामम सिनेमा आताच पाहून झाला. खरं सांगू तर मागील अनेक वर्षात वेगवेगळे भाषिक सिनेमे येऊन गेले पण या सिनेमाने अक्षरशः डोळ्यात पाणी आणलं. लवस्टोरी सिनेमा कसा असावा? याचे उत्तम उदाहरण हा सिनेमा आहे. Dulquer Salman आणि Mrunal Thakur अक्षरशः जीव ओतून कामे केली आहेत. दोघांची केमिस्ट्री एवढी सुंदर दिसते की आपण त्या दोघात आपण स्वतःला आणि आपल्या जोडीदाराला कधी पाहायला लागतो हे कळत सुद्धा नाही.

१९६४ मध्ये घडलेले हे कथानक दाखवलं आहे. राम एक अनाथ आर्मी ऑफिसर सीमेवर देशाची सेवा करतोय हे जेव्हा लोकांना कळते तेव्हा अनेक लोक त्याला पत्र पाठवायला सुरुवात करतात. यात एक पत्र सीताचे सुद्धा असते. रामला ती बायको म्हणून पत्र लिहून पाठवत असते. मग राम शोध सुरू करतो सीताचा. या शोधात खूप काही रंजक गोष्टी घडतात ते पाहणे खरंच खूप सुंदर वाटतं.

पण जेव्हा सीता बद्दल तिच्या आयुष्याची एक अशी गोष्टी असते जी आपल्याला समजल्यावर असे वाटते की हा तर आपण विचार केलाच नव्हता. ती गोष्ट काय आहे हे सांगून मी spolier देणार नाही. त्यासाठी तुम्हाला सिनेमा पहावा लागेल.

Sita Ramam
Image Credit: Sita Ramam Movie

सिनेमाचा शेवट जसजसा जवळ येतो अनेक वेळा आपल्या डोळ्यात नकळतपणे कधी पाणी येतं कळत सुद्धा नाही. तुम्ही स्वभावाने इमोशनल नसला तरीसुद्धा तुमच्या डोळ्यात पाणी असेल हे मी छातीठोक पणे सांगू शकतो.

पूर्ण देशाची क्रश रश्मीका मंदाना हिने या सिनेमात एक वेगळीच भूमिका साकारली आहे. ती अशी भूमिका सुद्धा करू शकते ही तिने दाखवून दिलं. पण मला या सिनेमात सर्वात जास्त कुणाचे काम आवडले असेल तर ते सीताचे म्हणजेच मृणाल ठाकूर या मराठमोळ्या अभिनेत्रीचे. किती गोड दिसते ती सिनेमात, असे वाटतं सारखं तिच्याकडे पाहतच राहावे. ज्या प्रकारे तिने या सिनेमात काम केलं आहे हे पाहून तिच्यात अभिनयाचे किती टॅलेंट आहे हे दिसून येतं. तिचे रडताना जेवढे पण सीन्स आहेत ते पाहून आपल्याही डोळ्यात पाणी येतं

बॉलिवूडमध्ये रिमेक सिनेमे बनत असताना तेलगू सिने सृष्टीतून आलेला हा सिनेमा खरंच भाव खाऊन जातो. प्रेमाची परिभाषा जाणून घेण्यासाठी प्रत्येकाने हा सिनेमा एकदा तरी नक्कीच पहावा. Amazon Prime वर तुम्ही सिनेमा पाहू शकता.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल