श्रुती हसन ही साऊथ सिनेमा मधील अत्यंत लोकप्रिय अशी अभिनेत्री आहे. तुम्हा सगळ्यांनाच माहीत आहे ती एका अभिनेत्याची म्हणजेच कमल हसन ह्यांची मुलगी आहे. ती जशी अभिनय या क्षेत्रात पारंगत आहे तशीच तिला गाणे म्हणायची आवड ही आहे. तिने आपल्या कारकिर्दीची सुरुवात तेलगू सिनेमातून केली असली तरी बॉलिवुड मध्ये ही तिने अनेक चित्रपट केले आहेत ‘वेलकम बैक, रमैया वस्तावैया, गब्बर इज बैक, लक, डी-डे, बहन होगी तेरी, रॉकी हैंडसम आणि तेवर’ या चित्रपट मधून ती आपल्याला बॉलिवुड मध्ये काम करताना दिसली आहे.
पण सध्या ती एका वेगळ्याच कारणाने प्रकाश झोतात आहे ते कारण आहे प्लास्टिक सर्जरीचे, फिल्म इंडस्ट्री मध्ये येणाऱ्या अनेक अभिनेत्री या इंडस्ट्रीमध्ये पारंगत झाल्यावर त्यांना सर्जरी करण्याचे वेड लागते. अशा अनेक अभिनेत्री आहेत त्यातील एक आहे श्रुती हसन हिने आताच आपल्या चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी केली आहे. आणि आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
पण श्रुती हसणं हिचे आताचे फोटो पाहून खरंच धक्का बसतो कारण या फोटोमध्ये तिचा चेहरा पहिल्यापेक्षा खूप बदलला आहे. आणि खरंच हे पाहून तिच्या चाहत्यांनी तिला ट्रोल केले आहे. हे पाहून श्रुती हसन हिने चाहत्यांना कडक शब्दात प्रतिउत्तर दिले आहे. ज्यावर प्लास्टिक सर्जरी केली आहे तो माझा चेहरा आहे आणि तो स्वीकारने हा माझे कर्तव्य आहे, त्यात मला कोणतीच लाज वाटत नाही.

तिने शेअर केलेल्या फोटो मधे ती खूप अंगाने बारीक वाटते, श्रुती हसन हिने नाक आणि ओठांची सर्जरी केली आहे हे तिनेच सांगितले आहे. आणि तिला याकरिता अजिबात लाज वाटण्यासारखे नाही वाटत. ती सांगते की हे जीवन माझे आहे आणि हा चेहरा ही माझा आहे आणि म्हणून मला माझ्या शरीरा मध्ये झालेला बदल बघायला आवडेल. मी स्वतःवर सर्वात जास्त प्रेम करते.