Home प्रवास श्री स्वामी समर्थांच्या देवस्थानी कधी गेलात का? स्वामीभक्त आवर्जून वाचा हा लेख

श्री स्वामी समर्थांच्या देवस्थानी कधी गेलात का? स्वामीभक्त आवर्जून वाचा हा लेख

by Patiljee
982 views

या धरतीवरील प्रत्येक व्यक्तीच्या मनात देव हा असतोच मग तो कोणताही असो. कारण जेव्हा माणूस कोणत्या तरी संकटात सापडतो तेव्हा त्याला फक्त देवाची आठवण येत असते. कारण त्याचापुढे दुसरा पर्याय नसतो. आणि खरंच देव असतो तुम्ही जर मनापासून त्या देवाची पूजा आणि प्रार्थना केली ना तर तुमच्या संकटाच्या वेळी तो नक्कीच धाऊन येईल अशी माझी खात्री आहे. तर मी आज माझ्या ज्या देवाबद्दल बोलणार आहे ते आहेत श्री स्वामी समर्थ. महाराज यांचे देवस्थान आहे अक्कलकोटचे स्वामी मंदिर. स्वामी समर्थांचे मंदिर अनेक ठिकाणी आहेत त्यांना दत्ताचा अवतार मानले जाते. ज्या ठिकाणी तुम्ही स्वामींची पूजा कराल त्या ठिकाणी तुम्हाला स्वामी समर्थांचा नक्कीच चांगला अनुभव येईल.

आज आपण पाहणार आहोत असेच एक प्रसिद्ध स्वामी समर्थांचे मंदिर आहे ते म्हणजे अक्कलकोट मंदिर खूप प्रसिद्ध मंदिर आहे हे तुम्ही गेलात का इथे कधी? नसाल तर जाऊन या. कारण ह्या ठिकाणी मनाला एक वेगळ्याच प्रकारची शांती मिळते. जणू आपण स्वर्गात आलोय असाच काही भास होतो. आज आम्ही तुम्हाला ह्या मंदिरा बद्दल काही गोष्टी सांगणार आहोत. तर मित्रानो या स्वामींनी कर्दळी वनात जाऊन 300 वर्ष तपश्चर्या केली होती. अक्कलकोटला या स्वामी समर्थांचे वास्तव्य 22 वर्ष म्हणजे त्यांच्या समाधी काळापर्यंत होते. तेव्हा ते नेहमी वडाच्या झाडाखाली बसलेले असायचे. स्वामींनी चैत्र शुद्ध त्रयोदशी सन 1878 मध्ये अक्कलकोट येते दुपारी 12 च्या वेळेस समाधी घेतली.

स्वामींचा भक्त चोळप्पा याच्या घराजवळ स्वामींची समाधी आहे, शिवाय त्यांच्या घरात स्वामींच्या पादुका आहेत. स्वामींच्या या मठामध्ये स्वामींच्या काही वस्तू आहेत या मठात गुरु पौर्णिमा, स्वामींची जयंती आणि दत्त जयंती असे उत्सव मोठ्या थाटामाटात साजरे केले जातात. स्वामी ज्या वडाच्या झाडाखाली 22 वर्षे राहिले त्या झाडाखाली त्यांचे शिष्य जोतिबा पांडे यांनी आपले घर दार विकून मंदिर बांधले या ठिकाणी भक्तगण आल्यानंतर संपूर्ण वातावरणात त्यांना स्वामींचे वास्तव जाणवते.

अक्कलकोटला या स्वामींचा भव्य असा मंदिर आहेच शिवाय गावात एक मठही आहे. तर हे मंदिर सोलापूर शहरापासून सुमारे 35 किलोमिटर अंतरावर आहे. इथे येण्यासाठी सोलापूर हून नियमित बस सेवा चालू असते. राहण्यासाठी निवासची सुविधा आहे तर त्याचप्रमाणे दुपारी बारा ते रात्री आठ यावेळी येथे महाप्रसाद तुम्हाला उपलब्ध होईल. स्वामींची तीस फुटांची मूर्ती, वडा खालची मूर्ती, जागृत पादुका, कपिला गाय, दीप माळ आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती या सगळ्या गोष्टीमुळे हा परिसर सदा चैतन्य पूर्ण असतो. येथे येणाऱ्या भाविकांसाठी पार्किंगची सुविधा ही करण्यात आली आहे शिवाय चालण्यासाठी लॉन ची सुविधा आहे.

तुम्हीही स्वामी समर्थांचे भक्त असाल मनापासून त्यांची उपासना करत असाल तर नक्की भेट त्या या मंदिराला तुम्हाला नक्कीच समाधान मिळेल. तुम्ही खरंच स्वामीभक्त असणार तर ह्या पोस्टच्या कमेंट मध्ये लिहा श्री स्वामी समर्थ.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल