श्रद्धा कपूर बॉलिवूड मधील एक नव्याने उदयाला आलेली अभिनेत्री. बापाने जरी खलनायकाची कामे करून लोकांना घाबरवले असले तरी तिने मात्र स्वतचे वेगळे स्थान प्रेक्षकांच्या मनात निर्माण केले आहे. एक उत्तम अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहे. तिने अशिकी २ ह्या सिनेमातून प्रचंड लोकप्रियता मिळवली होती.
या चित्रपटातील गाणी लोकांना आजही गुणगुणायला लावतात. सर्वच सुपरहीट ठरली होती ही गाणी. तिचा पहिला चित्रपट हा तीन पत्ती आहे पण यामधून ती इतकी प्रसिद्ध झाली नव्हती. लोकांना असेच अजूनही वाटतं की तिचा पाहिला सिनेमा आशिकी २ आहे.
त्यानंतर तिने स्ट्रीट डान्सर, स्त्री, एबीसीडी, हाफ गर्ल फ्रेंड, साहो, बागी , बागी ३… एक विल्हन, छीचोरे, ओके जानु, हसीना पार्कर इत्यादी चित्रपट मधून ती लोकांच्या पसंतीस उतरली आहे. पण काही प्रेक्षकांना श्रध्दा लग्न कधी करणार यांची चिंता लागून राहिली आहे प्रत्येकाच्या आयुष्यात जसा एक जोडीदार असतो. तसाच श्रद्धा कपूरच्या आयुष्यात ही कोणीतरी आले आहे आणि ते दोघे लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत.
श्रद्धा कपूर यागोदर जावेद अख्तर यांचा मुलगा फरहान अख्तरला डेट केलं होतं. परंतू काही मतभेदांमुळे दोघांनी आपल्या नात्याला पूर्णविराम दिला. पण सध्या ती पॉप्युलर फोटोग्राफर Rohan Shreshtha याच्याशी प्रेम बंधनात अडकली आहे. हा तिचा लहानपना पासूनचा चांगला मित्र आहे. त्यामुळे अर्थातच दोघांची मने ही सुद्धा एकरूप झाली असतील, आवडी निवडी माहीत असतील.

त्याचे वडीलही सुप्रसिद्ध फोटोग्राफर आहेत. श्रद्धा कपूरच्या घरात तिच्या आई आणि वडिलांना त्यांचे दोघांचे हे नाते मान्य आहे त्यांनी या नात्याला होकार दिला आहे त्यामुळे बहुतेक ते लवकरच लग्न बंधनात अडकतील.