Home बातमी अशा गोष्टी आहेत ज्या खऱ्या आहेत का खोट्या हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडत असेल?

अशा गोष्टी आहेत ज्या खऱ्या आहेत का खोट्या हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडत असेल?

by Patiljee
332 views

मित्रांनो या जगात अशा अनेक गोष्टी घडत असतात ज्यांच्यावर विश्वास ठेवणे म्हणजे खरोखर मूर्खपणाचे आहे असे तुम्हाला वाटत असेल आणि खरंच त्या गोष्टी असतातच त्या विश्वास न ठेवण्यासारख्या पण अशा काही गोष्टी आहेत ज्यांना तुम्ही अंधश्रध्देच्या नावाखाली वगळून लावता पण खरच त्या गोष्टींमध्ये काहीतरी वैज्ञानिक तथ्य आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

पूर्वीपासून आपल्या देशात सूर्य ग्रहण असल्यावर बाहेर पडत नाही किंवा काही प्रथा असतात त्या पाळल्या जातात. पण यांच्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहा कारण सूर्यग्रहण होत असताना त्यांच्यातील किरने बाहेर पडत असतात ती खूप जास्त हानिकारक असतात. त्यामुळे खरतर तुम्हाला अंधत्व येऊ शकते शिवाय त्वचेचे रोग होण्याची ही भीती असते.

असे म्हणतात की बाहेर पडताना किंवा एखाद्या चांगल्या कामासाठी जात असताना हातावर दही साखर ठेवले जाते. पण काही लोक ही एक अंधश्रद्धा मानतात पण दही खाल्याने तुमच पोट तसेच शरीर ही थंड राहते आणि शरीरामध्ये ग्लुकोजची मात्रा सुद्धा व्यवस्थित राहते त्यामुळे प्रवासात शारीरिक समस्या जास्त करून उद्भवत नाहीत.

बहुतेक लोक घरात कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती प्रवेश करू नये किंवा कोणाची दृष्ट लागू नये यासाठी घराच्या दारात लिंबू आणि मिरची टांगतात, आता म्हणाल तर ही अंधश्रद्धा आणि तस बघाल तर यात तथ्य आहे कारण लिंबू मध्ये सायट्रिक असिड असते ज्यामुळे तुमच्या घरात किडे मुंग्या हे शिरत नाही.

काही लोक शनिवारी केस कापत नाहीत या कार्यात कधी कधी आपण ही भाग घेतलेला असतो पण कित्तेक लोक या परंपरा अजूनही पाळतात काहींना तर त्याच्यामागचे कारण ही माहीत नसते तर काही जन शनिदेव यांची वाईट दृष्टी आपल्यावर पडते अशी अफवा आहे. पण तुम्ही कधी विचार केलाय का की एकदा तरी शनिवारी केस कापून बघायला हवे काय वाईट होते का? याउलट जाऊन काही लोकं ना शनिवार बघतात ना सोमवार केस कापून येतात खरचं का त्यांचे काही वाईट होते ? तसे नाही प्रत्येक वार हा आपल्यासाठी उत्तमच आहे.

अंत्यसंस्कार करून आल्यावर अंघोळ करावी असे आपल्या घरातील आजी आजोबा आपल्या नेहमी सांगतात पण त्यांचे हे सांगण्यामागे कारण जरी वेगळे असले तरी अंघोळ त्यावेळी अंघोळ करणे हे आपल्या शरीरातील नक्कीच चांगले आहे. कारण आपण जेव्हा हे अंत्यसंस्कार करून आलेलो असती तेव्हा आपल्या शरीरावर तेथील मृत शरीराच्या अंगावरील जीव जंतू यांचा प्रवेश झालेला असतो आणि त्यामुळे आपल्याला कोणता आजार होऊ नये याकरिता अंघोळ करणे बरोबर आहे.

एकदा का संध्याकाळ झाली की नखे कापायची नाहीत असे आपल्या घरातील आपल्याला ओरडून ओरडून सांगत असतात. पण पूर्वीच्या काळी लाईटची सोय नव्हती त्यामुळे रात्री नखे कापायला गेल्यास हाताला इजा होऊ नये हा त्यामागील उद्देश असेल. पण तरीही आजच्या काळात काही लोक हे पाळतात पण ते खर नाही आहे.
 
कधी कधी आपला डावा डोळा फडफडायला लागल्यावर आपल्याला अनेक जण बोलताना पाहिले असेल की काहीतरी वाईट घडणार आहे पण ह पूर्णपणे चुकीचे आहे डोळा फडफडणे ही आपली शारीरिक अडचण आहे. आपल्याला ताण, डोळा थकणे, ऍलर्जी किंवा डोळे कोरडे पडणे ह्यामुळे डोळा फडफडू शकतो.

कोणत्याही कामासाठी जात असाल तर तिघे जन जात नाहीत त्यामुळे तुमचे काम होतं नाही अशी एक अंधश्रद्धा आपल्या कडे जरा जास्तच प्रसिद्ध आहे किंवा तिघे जास्त असतील तर एक दगड खिशात घालून जावे. पण खरच बरोबर आहे का? तुम्ही तुमच्या मनाला विचार, ही फक्त एक अंधश्रद्धा आहे त्यात काहीच तथ्य नाही.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल