शिवाजी साटम ह्या नावाला कुणी ओळखत नाही असे होऊच शकत नाही. आपल्या अफलातून अभिनयाने अनेक सिनेमे त्यांनी याद नवगार बनवले आहेत. त्यांना पडद्यावर पाहताना असेच नेहमी वाटतं राहतं की आपण प्रत्यक्षात त्यांना समोर पाहतोय. एवढा त्यांचा अभिनय छान आहे. १९८८ मध्ये त्यांनी आपल्या अभिनयाला पेस्टोंजी ह्या सिनेमातून सुरुवात केली होती. ह्या सिनेमात त्यांनी डॉक्टरची भूमिका साकारली होती.
त्यांनी आपल्या कारकीर्दीत मराठी आणि हिंदी सिनेमात मिळून ३८ सिनेमात काम केले आहेत. पण सिनेमापेक्षा त्यांना खऱ्या अर्थाने घराघरात ओळख ही CID मालिकेने दिली. एसीपी प्रद्युमन हे पात्र त्याने चोख पणे बजावत १९९८ पासून चालू झालेला प्रवास २०१८ मध्ये संपला. एवढ्या वर्ष ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत होती. आज आम्ही तुम्हाला शिवाजी साटम ह्यांच्या वयक्तिक आयुष्याबद्दल काही गोष्टी सांगणार आहोत.
शिवाजी साटम वाइफ असे तुम्ही गुगलवर सर्च केलात तर तुम्हाला समोर अरुणा साटम नाव दिसेल आणि त्यासमोर अरुणा इराणी ह्यांचा फोटो येईल. पण खरतर ही माहिती चुकीची आहे. कारण त्यांच्या बायकोचे नाव जरी अरुणा असले तरी त्या वेगळ्या आहेत. त्यांच्या पत्नी बद्दल फारशी माहिती उपलब्ध नसली तरी शिवाजी साटम ह्यांच्या वडिलांनी त्यांच्या मित्राची मुलगी त्यांना स्थळ म्हणून सुचवली होती.
अरुणा ह्या राज्यस्तरीय कबड्डी पट्टू होत्या. मानाचा समजला जाणारा छत्रपती पुरस्कार सुद्धा त्यांना प्राप्त झाला होता. पण शिवाजी साटम सोबत त्यांची साथ फार काळ टिकली नाही. ब्रेस्ट कॅन्सर ने २००० मध्ये त्यांना देवाज्ञा झाली. त्यांच्या मागे त्यांचा एक मुलगा सुद्धा आहे त्याचे नाव अभिजित साटम आहे. मराठी सिनेमाचा निर्माता म्हणून तो सुद्धा प्रचलित आहे. त्याने मराठी अभिनेंत्री मधुरा वेलणकर हिच्यासोबत लगीनगाठ बांधली आहे.
वर दिलेल्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला नक्कीच मिळाले असेल. त्यामुळे कोणतीही गोष्ट सर्च करताना त्याचा आधी सहानिषा करा मगच त्या गोष्टीवर विश्वास ठेवा.