Home करमणूक शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकर येत आहे आपल्या भेटीला नव्या रुपात

शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकर येत आहे आपल्या भेटीला नव्या रुपात

by Patiljee
529 views

रात्रीस खेळ चाले या मालिकेतील शेवंता हिने या सीरियल मधून लोकांच्या मनावरचं नाही तर दिलावर ही अधिराज्य केले आहे. दिसायला देखणी आणि गोरीपान ही नटी या सीरियल मध्ये आपल्याला अगदी उठून दिसली. तिच्यासोबत अण्णा चे पात्र ही खूप प्रसिद्ध झाल्याचे आपणाला माहीतच आहे. जरी भय कथेवर आधारित ही सीरियल असली तरी अण्णा आणि शेवंता यांच्या नात्याची एक बाजू आपल्याला पाहायला मिळते. अपूर्वानं आपल्या करिअरची सुरुवात एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीतून केली. तिला टीव्ही वर येण्याची अजिबात इच्छा नव्हती पण आई वडिलांसाठी तिने टीव्ही सीरियलच्या दुनियेत पदार्पण केले.

Source Google

आभास हा, एका पेक्षा एक, जोडीचा मामला, रात्रीस खेळ चाले, तू माझा सांगाती या सीरियल मध्ये तिने काम केले आहे. तर भाकरखाडी, accidental प्राईम मिनिस्टर, इश्क़ वाला लव या सिनेमात तिने काम केले आहे. मिक्सर हा तिचा नवीन येणारा सिनेमा आहे. तर मित्रानो अपूर्वा ही येत आहे आपल्या भेटीला एक नव्या रुपात म्हणजे ती कोण्या सीरियल मध्ये नाहीत येत तर ती येत आहे एका नाटकात त्या नाटकाचे नाव आहे ‘इब्लिस’ हे नवीन मराठी नाटकाचे नाव आहे. या नाटकाची कथा नेमकी काय असणार आहे याची माहिती मिळालेली नाही पण या नाटकाचा पोस्टर नुकताच लॉन्च झाला आहे. या नाटकात तिचे ‘जुई’ असे नाव असणार आहे तर ‘शैतान हाजिर’ अशी या नाटकाची टॅगलाईन आहे.

अपूर्वा सोबत अभिनेते वैभव मांगले हे प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहेत. तसेच राहुल मेहेंदळे व सुनील देव हे कलाकार देखील महत्त्वाच्या भुमीका साकारणार आहेत. तर सांगायची गोष्ट अशी की अपूर्वा नेमळेकर ही नव्या रुपात आणि नव्या उत्साहात येत आहे तर तिची जादू ही रात्रीस खेळ चाले या सीरियल प्रमाणे प्रेक्षकांच्या मनात कायम राहिला का ? त्यासाठी तुम्हालाही पाहायला लागेल हे नाटक.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल