Home हेल्थ शेळीचे दूध, म्हशीच्या आणि गाईच्या दुधाप्रमाने मार्केटमध्ये का विकले जात नाही?

शेळीचे दूध, म्हशीच्या आणि गाईच्या दुधाप्रमाने मार्केटमध्ये का विकले जात नाही?

by Patiljee
557 views

आपल्या राज्यात शेळीचे उपयोग जास्त करून मांस खाण्यासाठी आहारात करतात पण दुधासाठी शेळी या पाळीव प्राण्याचा उपयोग खूप थोड्या प्रमाणत केला जातो. काही लोकांनी गाई आणि म्हशीच्या दुधा सारखाच हा ही व्यवसाय सुरू करण्याचे धाडस केले. पण त्यांना हवे तसे यश मिळाले नाही. त्यामुळे त्यांचे हे दूध विकण्याचे प्रयत्न बंद झाले.

संगमनेरी, उस्मानाबादी, बेरारी, कुही/गोंडी, कोकण कन्याळ, सुरती/खान्देशी इत्यादी शेळीच्या जाती या महाराष्ट्रात आढळतात. शेळीचे दूध विकण्याचे अनेक प्रयत्न झाले पण त्यात अजूनही हवे तसे यश प्राप्त झाले नाही. म्हणून अनेक ठिकाणी ते विकणे बंद झाले. पण अजूनही गुजरात व राजस्थान या भागात शेळीचे पाकीट बंद दूध विक्रीस उपलब्ध आहे. शिवाय एक शेळी ही किमान १ ते १.५ लिटर इतकेच दूध देऊ शकते शिवाय तिला जवळ जवळ २ ते ३ पिल्ले होतात. त्यांना शेळीचे दूध पिणे गरजेचे आहे नाहीतर ती पिल्ले ही अशक्त होण्याची भीती असते.

म्हणून या शेळ्यांचे जे काय दूध असते ते पिल्लानाच प्यायला मिळते. शिवाय महाराष्ट्र विद्यापीठाने या शेळीच्या दुधात वाढ होण्यासाठी काहीच संशोधन ही केलेलं नाही. काही लोकांच्या मते हे दूध पिताना एक प्रकारचा वास येतो. त्यामुळे हे दूध पिण्याची इच्छा होत नाही. पण तरीही हे दूध आपल्या शरीराच्या दृष्टीने खूप उपयोगी आहे. काही लोक डोळे आल्यावर हे दूध डोळ्यात टाकतात. त्यामुळे डोळे लवकर बते होतात. शिवाय शेळीचे दूध हे पचायला खूप हलके असते आणि या दुधामध्ये रोग प्रतिकारक घटक ही आहेत. शिवाय कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, खनिजे, जीवनसत्त्वे हे घटक ही मोठ्या प्रमाणात आढळतात.

याविरुद्ध गुजरात आणि राजस्थान या राज्यामध्ये शेळीच्या दुधाचा वापर आणि विक्री अधिक पटीने केली जाते. त्यामागे ही कारण आहे. कारण तेथील शेळ्या ह्या शरीराने धष्टपुष्ट असतात. शिवाय त्या एकावेळेस एकच पिल्लू जन्माला घालतात आणि त्यामुळे या शेळ्या दूध ही भरपूर देतात. शिवाय फार अगोदर पासून येथील स्थानिक लोक शेळीच्या दुधाचा उपयोग आहारात करत आहेत. त्यामुळे या ठिकाणी शेळीचे पाकीट बंद दूध उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल