पराग कान्हेरे हे नाव आपल्यासाठी नवीन नाहीये. एक उत्कृष्ट शेफ म्हणून त्याची महाराष्ट्रात नव्हे तर भारतात ओळख आहे. त्याने आपल्या अनेक नवनवीन डिशेस तयार करून लोकांना खाऊ घातल्या आहेत. स्वयंपाक करण्याची एक वेगळी कला त्याला उमगत आहे. डोळ्यावर पट्टी बांधून सुद्धा तो जेवण बनवू शकतो. त्याच्या ह्याच विक्रमामुळे त्याचे नाव शेफ एसिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंदवले आहे.
परागने आपल्या सोशल मीडियावरून काळ एक आनंदाची बातमी त्याच्या चाहत्यांना दिली आहे. कालच तो विवाहबंधनात अडकला आहे. त्याने मुक्ता भातखंडे सोबत लगीनगाठ बांधली आहे. मुक्ता ही एक मॉडेल आहे. ह्या क्षेत्रात ती दहा वर्षांपासून आहे. लोरियाल ल्याकमे फॅशन वीक साठी सुद्धा तिने काम केलं आहे. निवी कोस कार्ड ह्या स्पर्धेत ती दुसऱ्या स्थानावर होती. एक शेफ आणि मॉडेल ह्यांची जोडी ह्याच वर्षीपासून जमली होती. दोघेही एकमेकांच्या प्रेमात होते आणि मग दोघांनीही सहमतीने लग्नाचा विचार केला.
ह्या आधी बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात रुपाली भोसले सोबत परागचे नाव जोडले गेले होते. त्याने त्याच्या प्रेमाची कबुलीही सर्व जगासमोर केली होती. पण काही कारणास्तव हे नातं एकतर्फी राहिले आणि पुढे जाऊ शकले नाही. पण परागने खचून न जाता नेहमीच आपल्या कामात मन रमवले आहे. त्याच्या आयुष्यात आजवर अनेक संकटे आली आहेत पण नेहमीच त्याने ह्या संकटाना मात देत इथवर पोहोचला आहे.

त्याच्या ह्या नवीन इनिंग साठी त्याचे मित्र मैत्रिणीं चाहते त्याला शुभेच्छा देत आहेत. आपल्या पाटीलजी मीडिया कडून सुद्धा पराग आणि मुक्ताला नव्या आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा.