बिग बॉस मराठी आणि जुळून येते रेशीमगाठी या दोन शो मधून प्रचंड लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे शर्मिष्ठा. तिने अनेक मालिकांमध्ये तसेच मराठी चित्रपट मध्येही काम केले आहे. ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ तर दे धक्का, फक्त लढ म्हणा, ची व ची सौ का, काकस्पर्श, रंगकर्मी, योद्धा हे मराठी चित्रपट तिने केले आहेत. शिवाय काही नाटकांमध्ये ही तिने काम केले आहे.
शर्मिष्ठा हीचा या २१ जून रोजी साखरपुडा झाला आहे. तिने सोशल मीडियावर आपले फोटो ही नवऱ्यासोबत शेअर केले आहेत. त्या दोघांचे जानेवारीत साखरपुडा करण्याचे ठरले होते पण मध्येच लॉकडाऊन् झाल्यामुळे तिला थांबावं लागलं होत. पण सध्या सरकारने लॉक डाऊन ही शिथिल केलं आहे आणि आपल्या रोजच्या व्यवहाराला तसेच कार्याला ही काही प्रमाणात शिथिलता दिली आहे.
त्यामुळे शर्मिष्ठा हिने आपला साखरपुडा करण्याचे ठरवले आणि ते कार्य ही पार पडले. तिच्या या साखर पुड्यात तिची काही मित्रमंडळी नातेवाईक आणि तिचा नवरा म्हणजे तेजस देसाई यांचे काही नातेवाईक मिळून जेमतेम ३५ लोकांचा समूह होता त्यांच्यासाठी या कार्यात मास्क आणि सॅनिटायरचीची सोय ही करण्यात आली होती. आज त्याची सगळ्यात जास्त गरज आहे.
सोशल मीडियावर तिने आपले फोटो शेअर केले आहेत. चाहत्यांनी तिच्या या पोस्टला भरभरून प्रतिसाद दिला आहे तिला अनेक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. नाशिक मधील एका रिसोर्ट मध्ये हा समारंभ करण्यात आला होता. त्याचप्रमाणे लॉक डाऊनच्या सर्व नियमांचे पालन करूनच हा साखरपुडा समारंभ पार पडला.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अभिनेत्री लग्न कधी उरकणार तर येत्या ऑक्टोंबर महिन्यात ते दोघं आपलं लग्न पार पडणार आहेत, अशी घोषणा केली पण अजुन तारीख मात्र सांगितली नाही आहे. बघुया सध्या तरी आपण तिला शुभेच्छा देऊ या तिच्या पुढील वाटचाली करिता.
मेरा नाम जोकर मधील ही अभिनेत्री बघा सध्या काय करत आहे