Home हेल्थ कधी कधी साध्या कारणावरून आपल्या शरीराच्या कोणत्याही भागात लचक भरते म्हणजे काय

कधी कधी साध्या कारणावरून आपल्या शरीराच्या कोणत्याही भागात लचक भरते म्हणजे काय

by Patiljee
1097 views

कधी कधी आपण सहज कोणते तरी काम करत असताना किंवा उठताना, बसताना किंवा वजन उचलताना ही अचानक आपल्या शरीराच्या कोणत्याही भागात लचक भरते किंवा चमक भरते असे आपण म्हणतो. पण ही लचक म्हणजे नक्की काय असते हे आपल्या पैकी कित्तेक जनांना माहीत नसते. लचक दोन प्रकारे होऊ शकते. कधी कधी ती खूप जास्त त्रास देणारी असते तर कधी कधी हलक्या स्वरूपाची असते. लचक भरल्याने त्या ठिकाणची हालचाल काही काळ थांबते म्हणजे त्याची हालचाल आपल्याला सहन होते नाही म्हणून आपणच ती थांबवत असतो.

या लचक झालेल्या जागी काही वेळा सूज ही येते आणि त्यामुळे तो भाग थोडा जरी हलला किंवा कोणाचा धक्का लागला तर मात्र हा त्रास सहन करण्यापलीकडे असतो. कधी कधी सांधा सरकला आहे की काय असा भास ही होतो.

यासाठी घरगुती उपचार काय कराल तर ते आपण पुढे पाहूया

ज्या भागाला दुखापत झाली आहे तो भाग जास्त हलवू नये त्याला पूर्णपणे आराम द्यावा.

गरम पाण्याने शेक देऊ नये तर त्या जागी बर्फाने हळुवार शेक द्यावा. दिवसातून दोन वेळा तरी हा शेक द्या.

हाताला किंवा पायाला चमक भरली असेल तर मेडिकल मध्ये बांधायचे बँडेज मिळते ते आणून लावा. त्यामुळे तुम्हाला आराम मिळतो.

मालिश अजिबात करू नये आणि जोरात हालचाल ही करू नये. सांध्यांमध्ये पाणी होऊ नये म्हणून सांधा घट्ट बॅंडेजने बांधावा.

मोहरीचे तेल घेऊन त्या त हळद मिसळा आणि हे मिश्रण त्या जागी कापडाने बांधून घ्यावे.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल