Home करमणूक शरद केळकर ह्यांनी ह्या अभिनेत्यांना दिला आहे आपला आवाज , वाचा काय आहे कारण

शरद केळकर ह्यांनी ह्या अभिनेत्यांना दिला आहे आपला आवाज , वाचा काय आहे कारण

by Patiljee
427 views

शरद केळकर एक मराठी अभिनेता जरी नावाने हिंदी सिनेमात प्रसिद्ध असला तरी त्याचे रक्त हे मराठीच आहे. तो कितीही पुढे जावो पण आपल्या मराठी मातृभूमीला कधीही विसरणार नाही आणि विसरला ही नाही. आताच त्याची महत्वाची भूमिका असणारा सिनेमा तान्हाजी ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या सिनेमाच्या बाबतीत एका लेडी पत्रकारिकेने छत्रपती शिवाजी महाराजांना एकेरी नावाने बोलल्याबद्दल शरद केळकर यांनी तिच्या प्रश्नाला पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज असे बोलून रिपीट बोलायला लावले हा शरद केळकर तेव्हापासून लोकांच्या मनावरच नाही तर हृदयावर ही राज्य करतोय खरंच अशा अभिनेत्यांची गरज आपल्या मातृभूमीला आहे.

Source Sharad Kelkar Social Handle

तान्हाजी सिनेमात शिवरायांची भूमिका एवढी भारदस्त शरद केळकर ने निभावली आहे की पुढील काही वर्ष तरी आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दुसऱ्या कुणाला इमॅजिन सुद्धा करू शकत नाही.

साऊथ चित्रपट हे जेव्हा हिंदीमध्ये डब होतात तेव्हा त्यांना हिंदीमध्ये भाषांतरित केले जाते. त्यासाठी शरद केळकर याने ही आपले आवाज डब केले आहे ते म्हणजे बाहुबली या सुपरहिट चित्रपटासाठी. बाहुबलीचे दोन्ही भाग लोकांच्या पसंतीस उतरले आहेत तसा हा चित्रपट अनेक भाषांमध्ये रूपांतरित झाला होता पण हिंदिमधील बाहुबलीच्या आवाजासाठी शरद केळकर यांचा आवाज अगदी ऐकायला छान वाटतो. त्याच्या या आवाजात दमदारपणा शिवाय एक भारदस्तपणा आहे.

अमरेंद्र बाहुबली, महेंद्र बाहुबली आणि शिवा यांना त्याचाच आवाज आहे. शरद सांगतो की मी दिल्लीचा नाही पण मी लोकांना ‘दिल्ली का लडका’ आहे असे वाटते. शरदने बाहुबली आणि इतर हॉलिवुड सिनेमाला सुद्धा आपला आवाज दिला आहे. ह्यात एक्स मेन, आणि एक्स एक्स एक्स सिनेमात विन डिझेलला सुद्धा आवाज दिला आहे. त्याचा आवाज ह्या अभिनेत्यांच्या शरीरयष्टी अगदी उत्तमरित्या शोभून येतो म्हणून त्यांच्या हिंदी सिनेमात शरद केळकर ने डब्बिंग केले आहे.

या शरद केळकर ने आपल्या आवाजाची गोडी ही बॉलिवुड पर्यंतच नाही तर हॉलिवूडला दिली आहे त्याने हॉलिवूड मध्ये ही डब्बिंग केले आहे. 2004 मध्ये दूरदर्शनच्या ‘आक्रोश’ मधून त्याने पदार्पण केले. त्यांनी बॉलिवुड मध्ये हाऊसफुल 4, भूमी, रासलीला, मोहेंजोदारो, हिरो, गेस्ट इन लंडन या चित्रपटांमध्ये काम केले आहे तर मराठी मध्ये लय भारी या चित्रपटात खलनायकाची भूमिका लोकांच्या पसंतीस उतरली होती. त्याचदरम्यान अनेक हिंदी सीरियल मधून ही त्याने काम केले आहे.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल