Home करमणूक शरद केळकर यांच्या वयक्तिक आयुष्याबद्दल तुम्हाला माहीत आहे का? कसं आहे त्यांचं कुटुंब पहा

शरद केळकर यांच्या वयक्तिक आयुष्याबद्दल तुम्हाला माहीत आहे का? कसं आहे त्यांचं कुटुंब पहा

by Patiljee
416 views

शरद केळकर आताच तान्हाजी चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मुख्य भूमिका करणारा अभिनेता, या सिनेमा नंतर एका मोठ्या उंचीवर प्रेक्षकांनी त्याला नेऊन ठेवला आहे. या अभिनेत्याचा अत्यंत जिवंत अभिनय परखड आणि ठसठशीत, भारदस्त आवाज आणि त्याचे अतिशय देखणे रूप अशी या अभिनेत्याची ओळख आहे. या अभिनेत्या बद्दल तुम्हाला माहीत असेल पण त्याच्या कुटुंबाबद्दल तुम्हाला माहीत नसेल तर जाणून घेऊ या कुटुंबाबद्दल काही महत्त्वाचे.

शरद केळकर याच्या बायकोबद्दल तुम्हाला माहीत आहे का? ही सुद्धा एक अभिनेत्री आहे. दिसायला खूप सुंदर अशी कीर्ती गायकवाड शरद केलकरच्या प्रेमात पडली. यासाठी एकमेव कारण म्हणजे त्या दोघांनी एकाच मालिकेमध्ये काम केले आहे. ते म्हणजे हिंदी मालिका होय. तिचे नाव आहे “सात फेरे”. या मालिकेच्या सेटवर त्या दोघांचे प्रेम बहरत गेले आणि एक दिवस असा आला की त्यांनी लग्न करायचे ठरविले.

त्या दोघांनी 2005 साली आपले लग्न पार पडले आणि आता त्यांना एक मुलगी ही आहे, तीच नाव आहे कीशा. हा अभिनेता आपल्या कामात लोकांना इतका भावला की तो छोट्या पडद्यावरून मोठ्या पडद्यावर झळकला. किर्तीने याअगोदर सात फेरे, छोटी बहू, ससूराल सिमर का या मालिकेत काम केले आहे.

Source Sharad Kelkar Social Handle

अभिनयात येण्याच्या अगोदर शरद केळकर जिममध्ये नोकरी करायचा, हे थोड्या बहुत लोकांना माहीत असेल. एमबीए पूर्ण झाल्यानंतर शरदने फिजिकल एज्युकेशनच्या क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शरदने जिम इन्स्ट्रक्टर म्हणून काम केले. 2002 या साली शरद केळकर याने ग्रेसिम मिस्टर इंडियाचा फायनलिस्ट ठरला पण त्याला ते विजेतेपद मिळू नाही.
,
या अभिनेत्याने अनेक हिंदी सीरियल मध्ये काम केले आहे पण यातून तो जास्त लोकांच्या पसंतीस उतरला नाही पण यानंतर त्याने हलचल, गोलियों की रासलीला रामलीला, हीरो,  मोहनजोदारो, रॉकी हँडसम इत्यादी चित्रपटांमध्ये काम केले आणि ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. त्याने मराठी चित्रपटात ही काम केले आहे लय भारी या सिनेमात त्याने एका व्हीलनची भूमिका केली होती.

शरद केळकर ने आतापर्यंत साकारलेल्या पात्रापैकी तुमच्या आवडीचे पात्र कोणते आहे? हे आम्हाला नक्की सांगा.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल