आज आपण ज्या ग्रहाबद्दल बोलणार आहोत त्याच नाव आहे शनि ग्रह. सूर्यापासून याचा क्रमांक सहावा लागतो. शनी ग्रह देखील गुरूप्रमाणेच वायुरूपात आहे. शनीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास साधारणत: २९ वर्ष लागतात. शनीभोवती बर्फ व अंतरीक्ष कचऱ्यापासून बनलेली कडी आहेत. सगळ्या ग्रहांमधे विचित्र आणि वेगळा असा वलयकारी ग्रह म्हणून ओळखला जातो. शनि ग्रहावर असे काय आहे आणि त्याच्या वरच आवरण आपल्या पृथ्वी सारखे आहे का? किंवा शनि ग्रहाच वातावरण नक्की कसे आहे? आज आपण शनि या ग्रहाबद्दल थोड बोलणार आहोत.
तर मित्रानो कितीतरी ऐतिहासिक ग्रंथांमध्ये आपल्याला यांच्याविषयी माहिती मिळते पण आधुनिक युगात याची माहिती गेलीलिव्ह याच्याकडून मिळाली. त्यांनी सन 1610 आपल्या टेलिस्कोप या माध्यमाद्वारे शनी ग्रहाला पहिल्यांदा पाहिले होते. शनी ग्रहावर आपण आजपर्यंत चार मिशन पाठवले आहेत. यात लास्टला केसिनी व्हायगंस याच्या द्वारे आपल्याला शनी जास्त जवळून पाहता आले.
शनी ग्रह त्याच्या कडामुके सर्वात वेगळा भासणारा हा ग्रह याची कडा आपण कोणत्याही टेलिस्कॉप च्या माध्यमातून पाहू शकतो. नासाच्या वैज्ञानिकांनी केसिणी हे यान शनी ग्रहावरती सोडले या मिशन द्वारे शनी ग्रहावरील आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी समजल्या गेल्या. सगळ्यात पहिले शनी ग्रहावरची रिंग अत्यंत स्पष्ट पने बघण्यात आली. ही रिंग बर्फाचे छोटे छोटे तुकडे आणि दगडांच्या तुकड्यांनी बनलेली आहे.
शनी एक वायूचा मोठा गोळा आहे त्यावर हायड्रोजन आणि हेलियम गॅस मोठ्या प्रमाणत आहेत. शनीचे वजन हे खूप कमी आहे म्हणजेच पाण्यापेक्षा ही कमी शनी ग्रहाला एका समुद्रात सोडले तर तो त्या पाण्यावर तरंगत राहील. शनि ग्रहाचे आंतरिक तापमान खूप जास्त म्हणजे सूर्याच्या किरणांपासून येणाऱ्या गरमी पेक्षा ही दुप्पट आहे आणि त्यामुळे शनी ग्रहावर जोरदार वादळ येतात.
काही धार्मिक महत्त्व
शनीचा आकाशातील अन्य तारकांच्या संदर्भातील वेग अतिशय कमी आहे. म्हणजे अडीच वर्षांमध्ये शनी फक्त एक रास (३० अंश) पुढे जातो. त्यामुळे शनीला संस्कृतमध्ये ’मंद’ म्हणतात. भारतीय ज्योतिष शास्त्रानुसार एखाद्या माणसाची जी (चंद्र)रास असेल त्या राशीत किंवा तिच्या आधीच्या किंवा पुढच्या राशीत जेव्हा शनी असतो, तेव्हा ता माणसाला साडेसाती आहे असे समजले जाते.
शनीला बारा राशींतून सूर्याभोवती प्रदक्षिणा करायला २९.४ वर्षे लागतात. म्हणजे तो एका राशीत अडीच वर्षे असतो. ती रास आणि तिच्या आधीची व नंतरची रास असण्याच्या साडेसात वर्षांच्या काळाला शनीची साडेसाती म्हणतात. हा काळ माणसासाठी वाईट समजला जातो.
जोपर्यंत शनीला लंकापती रावणाने उलटे पाडून आपल्या सिंहासनाच्या पायाखाली दडपून ठेवले होते, तोपर्यंत त्याला साडेसातीची भीती नव्हती. हनुमानाने लंकादहनाच्या सुमारास शनीला सुलटे केले, त्याची दृष्टी रावणावर पडली आणि रावणाची दुर्दशा सुरू झाली अशी कथा आहे.