आपण भारतीय क्रिकेट साठी किती वेडे आहोत हे आपल्याला काही वेगळे सांगायची गरज नाही. प्रत्येक भारतीयाच्या मनात क्रिकेट आहे. भारतीय क्रिकेट पुरुष संघाला आपण जेवढं प्राधान्य देतो तेवढेच प्राधान्य आपण महिला क्रिकेट संघाला देत नाही ही खंत नेहमीच मनाला चटका लावून जाते. पण अलीकडच्या काळात महिला क्रिकेट संघाने आपल्या उत्तम कामगिरीने क्रिकेट रसिकांच्या मनात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. ह्या मध्ये खूप मौलाचा असा वाटा असेल तर भारतीय कर्णधार मिताली राजचा.
मिताली ने आपल्या अष्टपैलू कामगिरीने भारतीय महिला संघाला उंच शिखरावर नेऊन ठेवलं आहे. तिने २६ जून १९९९ मध्ये आयर्लंड संघासोबत पदार्पण केले होते. कसोटी एकदिवसीय आणि टी ट्वेण्टी सामन्यात तिने ९९१५ धावा आहेत. ह्यात ८ शतक आणि ७४ अर्धशतकाचां समावेश आहे. तिने आपल्या खेळाने नेहमीच वर्चस्व अबाधित ठेवलं होतं. तिच्या ह्याच कामगिरीमुळे तिला पद्मश्री, अर्जुन अवॉर्ड, युथ स्पोर्ट्स आयकॉन, वोगु स्पोर्ट्स पर्सन असे प्रसिद्ध पुरस्कार प्राप्त झाले आहे.
बॉलीवुड आणि क्रिकेट दोन्ही भारतीयांसाठी जिवलग गोष्टी आहेत. मग अशातच जेव्हा क्रिकेट मध्ये मिताली राज हिच्यावर सिनेमा येतोय म्हटल्यावर सर्वांच्या भुवया नक्कीच उंचावल्या आहेत. तिच्या ह्या बायोपिक मध्ये तापसी पन्नु मुख्य भूमिका साकारताना आपल्याला दिसेल. हा सिनेमा ५ फेब्रुवारी २०२१ मध्ये प्रदर्शित होणार आहे. ह्या सिनेमाचे नाव शाब्बास मिथू असे ठेवण्यात आलं आहे. मिताली राज बद्दल फक्त खेलासंदर्भात लोकांना गोष्टी माहीत आहेत. तिच्या वयक्तिक आयुष्याबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे. त्यामुळे ह्या सिनेमा द्वारें आपल्याला तिच्या अनेक अनोळखी गोष्टी जाणून घेता येतील.

तुम्ही सुद्धा ह्या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहात का नाही? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.