आपण अनेक ठिकाणी प्रवास करत असतो आणि त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे अनुभव येत असतात. पण काही अनुभव असे असतात की, त्यावर हसावे की रडावे हे ही कळत नाही अशाच प्रकारचा अनुभव शबाना आझमी यांना आला आहे. त्या जेव्हा चेन्नई एयरपोर्ट गेल्या होत्या तेव्हा त्यांना तिथे एक साइन बोर्ड बघायला मिळाले त्यात असे काही लिहायला होते ते बघून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला त्या साइन बोर्ड वर इंग्रजी मध्ये असे काही लीहले होते की ते वाचून त्यांनी त्या संदर्भात सोशल मीडियावर पोस्ट केली होती.

शबाना आझमी यांनी ह्या बोर्ड चे फोटो आपल्या अकाउंट मध्ये पोस्ट केले होते. साइन बोर्ड वर एयरपोर्ट मध्ये फरशीवर बसून खाणे सक्त मनाई आहे (Eating on the Floor is Strctly prohibited ) पण जे या बोर्ड वर लिहले होते ते असे की, ‘Eating carpet is strictly prohibited.’ म्हणजे याचा अर्थ असा होतो की कार्पेट खाणे सक्त मनाई आहे. सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल झाली आहे यावर शिल्पा शेट्टी आणि टिस्का चोपड़ा यांनी ही शेअर केले आहे.
मित्रानो तुम्हीही असे बऱ्याच ठिकाणी फिरत असाल तेव्हा असे काही वेगळं दिसलं तर आपल्या हातात जादूच यंत्र तर असेच म्हणजेच तुमचा मोबाईल. लगेच फोटो काढून सोशल मीडियावर अपलोड करून टाकायचा.