होय बातमी ऐकून आश्चर्य वाटले ना , तुम्ही अगदी बरोबर माहिती वाचलीत, दिल्ली मधील सीमा ढाका या कॉन्स्टेबल महिला आऊट ऑफ टर्म भढती मिळवणाऱ्या पहिल्या महिला कॉन्स्टेबल ठरल्या आहेत. त्यांनी 76 बेपत्ता लहान मुलांचा शोध लावत मोठी कामगिरी केली आहे. सीमा ढाका या सामयपूर बदली पोलीस स्टेशन या ठिकाणी कार्यरत आहेत. याविषयी बोलताना सीमा ढाका म्हणाल्या की या कामगिरीने मला या बेपत्ता मुलांना त्यांच्या आईवडिलांची भेट घालून दिल्याचा आनंद होत झाला आहे. आणि कंमिशनर साहेबांनी माझ्या कामाची दखल घेतली व माला बढती देऊ केली त्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे यामुळे माझ्यासारख्या अनेकांना उभारी मिळून अशाच कामांसाठी प्रोत्साहन मिळेल.
ढाका यांनी 2006 साली पोलीस डिपार्टमेंट जॉईन केले होते. त्यानंतर 2014 मध्ये त्यांना बढती मिळली आणि त्या हेड कॉन्स्टेबल बनल्या. त्यानंतर त्यांची दिल्ली येथे बदली झाली आणि पुढची वर्ष त्या तिथेच कार्यरत राहिल्या. 7 ऑगस्ट ला दिल्ली पोलीस कमिशनर एन. श्रीवास्तव यांनी सीमा ढाका यांना आऊट ऑफ टर्म बढती सहित विशेष रक्कम ही दिली जाईल अशी घोषणा केली . या विभागात त्यांनी या आधीच 12 महिन्याच्या आत 50 पेक्षा जास्त मुलांचा शोध लावला ज्यात मुलांचे वय 14 पेक्षा कमी असेल अश्या कॉन्स्टेबल किव्वा हेडकॉन्स्टेबल यांना ही बढती देण्यात येईल शिवाय 15 पेक्षा जास्त मुलांचा शोध लावल्यास ” अन्नण्यासाधरण कार्य” हा पुरस्कार देखील देण्यात येईल असे सांगितले होते.
या इन्सनटीव्ह स्किम अंतर्गत आऊट ऑफ टर्म बढती मिळवणाऱ्या आणि एवढया कमी वेळात 76 मुलांचा शोध घेऊन त्यांना सुरक्षित वाचवणाऱ्या पहिल्या महिला कॉन्स्टेबल ठरल्या आहेत. यांनी 76 मुलांना अडीच महिन्याच्या आत एका मोठ्या रॅकेट मधून शोधून काढले. त्यातील 56 मूलं ही 14 वर्षाच्या आतील मुलं होती. त्यानंतर कमिशनर श्रीवास्तवा यांनी आपल्या अकाउंट वरून ट्विट करत ‘ हेड कॉन्स्टेबल सीमा ढाका ,पी एस, समयपूर बादली यांचे मनापासून अभिनंदन ” सीमा कॉन्स्टेबल आता प्रमोशन साठी पात्र असून बेपत्ता मुलांच्या आईवडिलांना त्यांची मुलं भेटवल्या बद्दल आनंद वाटत आहे.
ढाका यांनी याबद्दल बोलताना सांगितले त्यांनी या मुलांना फक्त दिल्ली मधूनच नाही तर बाकी राज्यांमध्ये जाऊनही सोडवले. हे काम त्यांनी जवळ जवळ तीन महिन्यांच्या आत पूर्ण केले. त्यांनी 2 मुलं वेस्ट बंगाल मधून शोधले, 2 मुलं ही पंजाब मधील हिशीयरपूर डिस्ट्रिक्ट मध्ये सापडले, आणि बाकीचे गुरगाव, गाझियाबाद, नोएडा, पानिपत , आणि बिहार या राज्यांमध्ये शोधले. नक्कीच हे काम सोपे नव्हते. त्यातल्या एका मुलाची मिस्सिंग केस 2018 मध्ये नोंदवली गेली होती. त्यानंतर 2020 मध्ये तो मुलगा वेस्ट बंगाल मध्ये सापडला, यामागे भरपुर मोठ्या प्रमाणावर मुलांचे अपहरण आणि तस्करी असल्याच सांगण्यात येते. मुलगा 7 वर्षाचा असताना बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या आईने 2018 मध्ये पोलिस्टेशन मध्ये नोंदवली होती मात्र त्यानंतर ही त्याचा शोध लावण्यात पोलिसांना यश आलं नव्हतं. त्यानंतर हे प्रकरण मागे पडले दरम्यान मुलाच्या आईने घर बदलले, काँतक्ट नंबर देखील बदलला गेल्याने त्या मुलाच्या कुटुंबियांना शोधणे हे देखीक आव्हान होते.
वेस्ट बंगाल मध्ये या मुलाचा शोध लागल्याने दोन नद्या पार करत त्या मुलाच्या मूळ गावी पोहचल्यावर ही बराच वेळ त्यांना शोधण्यासाठी लागला, त्यांच्या मते सापडलेला मुलगा त्याच्या मूळ घरी जाण्यासाठी तयार नव्हता. तपासात असे कळले की मुलाच्या आईने दुसरे लग्न केले होते त्यामुळे मुलाच्या सावत्र बापाकडून मुलाला योग्य वागणूक मिळत नव्हती, मानसिक आणि शरीरिक त्रासाला कंटाळून त्याने घर सोडले होते..
सर्व मुलांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करून खूप समाधान वाटत आहे असे मत ढाका यांनी व्यक्त केलं.