Home संग्रह खरंच! सरड्याने डोळ्यात फूंक मारल्यास आपले डोळे जातात का? काय सत्य काय खोटं वाचा

खरंच! सरड्याने डोळ्यात फूंक मारल्यास आपले डोळे जातात का? काय सत्य काय खोटं वाचा

by Patiljee
753 views

मित्रानो एखादा माणूस हा एका वेळी एक आणि दुसऱ्या वेळी दुसरच काही बोलत असतो तेव्हा आपण त्याला रंग बदलणाऱ्या सरड्याची उपमा देतो. पण सरडा का रंग बदलत असतो तर आपल्या रक्षणासाठी त्याला त्या त्या वेळी आणि त्या जागी मिसळून जाण्यासाठी किंवा एखाद्या शत्रुंपासून रक्षण होण्यासाठी तसेच आपली शिकार मिळवण्यासाठी सरडा हा रंग बदलत असतो. त्याच्या त्वचेखाली असणाऱ्या रंग द्रव्यांमुळे तो रंग बदलत असतो. मुळात त्याचा रंग हा हिरवा असतो. त्याचप्रमाणे त्याच्या अंगावर पडणारे प्रकाश शिवाय आजूबाजूचे वातावरण यानुसार ही त्याचे रंग बदलत असते.

Source Rahul Photography

काही लोकांचा असा समज आहे की या सरड्याने जर तुमच्या डोळ्यात फुक मारली तर तुमचे डोळे जातात हे खरे आहे का तर अजिबात नाही ही एक अफवा आहे सरडा हा बिन विषारी प्राणी आहे त्यामुळे तो चावला किंवा त्याने फुंक मारल्यास आपल्या शरीराला कोणताही अपाय होत नाही हे आपण ही लक्षात घ्यायला हवं आणि आपल्या लहान मुलांना ही सांगायला हवे. जेणेकरून हे प्राणी वाचतील.

या सरड्याची नखे ही खूप तीक्ष्ण असतात जेणेकरून झाडावरून आणि फांद्यांवरून चालताना आपली पकड मजबूत राहावी या सर्ड्याला इंग्लिश मध्ये शामेलियन लीझर्ड तर मराठीत याला घोयरा असे म्हणतात. आपल्या आजूबाजूच्या झाडगलीत, शेतात, जातायेता सहज दिसणार्या सरड्यांच्या वर्गात मोडणारा हा घोयरा सरडा मात्र मुबलक प्रमाणात मिळत नाही. अख्ख्या भारतात घोयरा सरड्याची फ़क्त एकच जात मिळते. तहान लागल्यावर हा पानावरील दवाचे पाणी पीत असतो जास्त करून झाडावर राहायला याला आवडते. त्याचे खाद्य हे किडे मकोडे, भुंगे, फ़ुलपाखरं, मोठे मुंगळे अशा प्रकारचे असते.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल