Home प्रवास नाशिक मध्ये असणारी वनीची सप्तशृंगी देवी येथील खास वर्णन तुमच्यासाठी

नाशिक मध्ये असणारी वनीची सप्तशृंगी देवी येथील खास वर्णन तुमच्यासाठी

by Patiljee
550 views

नाशिक पासून वणीच्या सप्तशृंगी देवीच्या जाण्याच्या रोडला दोन्ही बाजूने उंचच उंच अशा पर्वत रांगा आहेत. नाशिक शहरापासून तब्बल 65 किलोमिटर अंतर म्हणजे सह्याद्री पर्वत साखळीतील सात डोंगरांचा परिसर इथे स्थित आहे. असे म्हणतात की जेव्हा या धर्तीवर महिषासुर या राक्षसाचा आतंक वाढला, त्यावेळी त्याने स्वर्गातील देवांनाही नको करून सोडले होते. त्याला शंकराचा वर मिळाला होता. त्यानंतर ब्रह्मा विष्णू व महेश या त्रिमूर्ती कडे मदतीची याचना करू लागले. त्या तिघांनी आपले सामर्थ्य एकवटून एका तेजाची निर्मिती केली. ते तेज अंबेच्या रूपाने पृथ्वीवर अवतरले.

यातूनच सप्तशृंगी देवीच्या उदय झाला. संपूर्ण भारतात देवीचे शक्तिपीठे ही 108 आहेत तर त्यातले साडेतीन शक्तिपीठे ही महाराष्ट्रात आहेत. त्यातील अर्धे शक्तिपीठ म्हणून वणीची सप्तशृंगी माता ही आहे. पर्वतात बसलेली देवीची मूर्ती ही आठ फुटांची आहे तर तिला अठरा हात आहेत या अठरा हातांमध्ये वेगवेगळे शस्त्र देवीने धारण केलेले आहेत. सप्तशृंगी हा महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. तो नाशिक जवळील नांदुरी गावाजवळ वसलेला असून अनेक कुटुंबांची कुलदैवत असलेल्या सप्तशृंगी देवीचे तीर्थक्षेत्र आहे. देवीची संपूर्ण मूर्ती लाल शेंदुराने लीपलेली आहे देवीला अकरा वारी साडी तर चोळीचे तीन खन लागतात. शिवाय वेगवेगळा अलंकारांनी या देवीला सजवलेले आहे.

देवीचे दर्शन घेण्यासाठी 472 पायऱ्या चढायला लागतात सकाळी पाच वाजता देवीचे दरवाजे उघडले जातात आणि त्यानंतर सहा वाजता काकड आरती होते. त्यानंतर पुन्हा संध्याकाळी 7.30 ला शेजारती होऊन पुन्हा मंदिराचे दरवाजे बंद करण्यात येतात. पर्वताच्या शिखरावर चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या मध्यरात्री दरेगावचे गवळी पाटील कीर्तिध्वज फडकवतात. हा मान त्यांचा असतो. येथे जाण्यासाठी नाशिक बस स्थानकावरून बस आहेत त्या तुम्हाला दिंडोरी नाका येथे आणून सोडतात तर राहण्यासाठी येथे धर्म शाळेच्या खोल्या उपलब्ध आहेत. शिवाय 15 रुपयात इथे पोटभरून जेवायला मिळेल.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल