समीर चौघुले हे नाव जरी ऐकले तरी आपोहून गालावर हास्य येते. त्याचे अनेक स्किट आपण ऑनलाईन पाहत असतो. कितीही टेन्शन असेल कितीही त्रास असेल तरीही समीर चौघुलेचे व्हिडिओ पहिल्या वर चेहऱ्यावर हसू येणार ह्यात काहीच शंका नाही. तुम्हाला नेहमीच खळखळून हसवनाऱ्या ह्या कलाकाराच्या वयक्तिक आगुष्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? चला आज आपण समीर चौघुले ह्यांची बायोग्राफी जाणून घेऊया.
समीरचा जन्म २९ जून १९७३ मध्ये झाला. त्याने आपले शालेय जीवन शैलेंद्र एज्युकेशन सोसायटी मधून केले तर त्याने आपली डिग्री १९९३ एम एल डहाणूकर कॉलेज ऑफ कॉमर्स मधून घेतली आहे. त्याने कॉलेज आयुष्यात अनेक नाटकात काम करायला सुरुवात केली होती. इथूनच त्याला अभिनायचे वेड होते. आपले कॉलेज संपल्यानंतर त्याने ह्याच क्षेत्रात आपल्याला करीयर करायचे आहे असा ध्यास मनी तयार केला होता.
मुंबई मध्ये प्रायव्हेट क्षेत्रात काम करत असताना शेवटी त्याने २००२ मध्ये आपला जॉब सोडून अभिनयात उतरला. त्याने अनेक नाटकात, मालिकात आणि सिनेमात छोट्या छोट्या भूमिका साकारल्या. त्याने श्री बाबा समर्थ, बालक पालक, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक, व्यक्ती आणि वल्ली, यदा कदाचित, वाऱ्या वरची वरात, असा मी असा मी ह्या मराठी नाटकात तर केरी ओन हेवन्स आणि बेस्ट ऑफ बॉटॉम् ह्या इंग्लिश नाटकात सुद्धा कामे केली आहेत.

कायद्याचं बोला, आजचा दिवस माझा, मुंबई मेरी जान, वक्रतुंड महाकाय, पेईंग घोस्ट, मुंबई टाइम आणि विकून टाक ह्या मराठी सिनेमात सुद्धा कामे केली आहेत. २०१६ मध्ये संस्कृती कलादर्पण नाट्य विभाग आणि २०१५ मध्ये झी नाट्य गौरव पुरस्कार सुद्धा मिळाला आहे. त्याच्या पत्नीचे नाव कविता समीर चौघुले आहे. पण ती ह्या झगमगत्या दुनियेपासून लांब राहणे पसंद करते.
सध्या समीर सोनी मराठीवरील कॉमेडीची हास्यजत्रा ह्या रिऍलिटी शो मध्ये काम करत आहे. विशाखा सुभेदार सोबत त्याची अफलातून कॉमेडी नेहमीच रसिक प्रेक्षकांचं मन जिंकत.